Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : सेनेच्या ठाकरे गटातर्फे संघटनात्मक नियुक्त्या

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरु असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आज संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरु असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आज संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या. माजी नगरसेवक केशव पोरजे व निवृत्ती लांबे यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नवीन नियुक्त्या ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील असल्याने निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक जबाबदारी देऊन बळकटी आणण्याचा प्रयत्न आहे. ()

लांबे यांच्याकडे त्र्यंबकेश्वर, हरसूल, ठाणापाडा तर केशव पोरजे यांच्याकडे गोवर्धन,गिरणारे गट, देवळाली,भगूर,नाशिकरोड, जेलरोडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुकाप्रमुख म्हणून समाधान बोडके (त्र्यंबकेश्वर पूर्व), नितीन लाखन (त्र्यंबकेश्वर पश्चिम), राजाभाऊ नाठे (इगतपुरी) यांची नियुक्ती झाली आहे. विधानसभा प्रमुख म्हणून कचरू पाटील डुकरे (इगतपुरी), व संपत चव्हाण (त्र्यंबकेश्वर)  (latest marathi news)

विधानसभा समन्वयक म्हणून भगवान आडोळे (इगतपुरी)व देवीदास जाधव (त्र्यंबकेश्वर) यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभा उपप्रमुख म्हणून सोमनाथ जोशी यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या झाल्याने नवीन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून ते आपल्या पदाला पुरेपूर न्याय देतील, असा अविश्वास सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा: हर्षित माहीमकरला दुहेरी मुकुटाची संधी, १७ वर्षांखालील मुले व पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत

राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Narendra Modi : नायजेरियाबरोबरील भागीदारी महत्त्वाची मोदींचे प्रतिपादन; तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

SCROLL FOR NEXT