nationalist congress party (sharadchandra pawar) esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election Result 2024 : निफाडमध्ये भाजपचे बुरूज ढासळले, तुतारीचा बोलबाला!

एस.डी.आहिरे

पिंपळगाव बसवंत : केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराला पराभवाचा दे धक्का देत सामान्य शिक्षक असलेले भास्कर भगरे हे ‘जायंट किलर’ ठरले. त्यात निफाडची भुमिका महत्वाची ठरली आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये निफाड हा भाजपचा बालेकिल्ला होता. भाजपचे ते बुरूज यंदा पूर्णपणे ढासळले आहे. (Nashik Lok Sabha Election Result 2024)

डॉ. पवार यांची निफाड मतदारसंघात पिछेहाट हे आमदार दिलीप बनकर यांना धोक्याची घंटा आहे. तर भगरे यांची तुतारी निफाडमध्ये वाजविण्यात किंगमेकरची भूमिका बजावणारे माजी आमदार अनिल कदम यांचे हौसले बुलंद झाले आहेत. भगरे यांना खासदार पदावर पोहचवून विधानसभेच्या लिटमस टेस्टमध्ये कदम यांनी बाजी मारली आहे.

दिडोंरी लोकसभेसाठी महायुतीकडून डॉ.भारती पवार विरूध्द महाविकास आघाडीचे भास्कर भगरे अशी लढत जाहीर झाली. त्यावेळी कोण भगरे आणि ते डॉ. पवार यांच्याविरोधात तग धरतील का, अशी चर्चा निफाडमध्येही सुरू होती. भगरे यांना ओळख मिळवून देण्याबरोबरच निफाडमधून मताधिक्य मिळवून देण्याचे शिवधनुष्य माजी आमदार अनिल कदम यांनी उचलले व मतमोजणीत ते यशस्वी झाल्याचे दिसून आले.

कदम यांनी थेट बांधाबांधावर जाऊन स्वत: उमेदवार असल्यासारखा प्रचार केला. शिवसैनिकांना प्रचाराला जुपले. कांद्यासह शेती प्रश्‍नावरून निफाडमध्ये उद्रेक झाला होता. शिवाय शरद पवार यांच्या निफाडमध्ये झालेल्या सभेने तुतारीची हवा शेवटपर्यंत कायम ठेवली. (latest marathi news)

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भाजपकडून केली गेलेली तोडफोड येथील पवार समर्थकांना चिड आणणारी ठरली. त्यातून आमदार बनकर यांचे काही समर्थक तुतारीच्या प्रचाराला भिडले अन् थेट अनिल कदम यांच्या व्यासपीठावर दिसले.

मोदी, मुंडे यांची सभा ठरली फुसका बार...

केंद्र शासनाच्या शेतीविरोधी धोरणाचा भाजपला सर्वाधिक फटका कांद्याचे माहेरघर असलेल्या दिंडोरी मतदारसंघात बसणार होता. ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टोलेजंग सभा झाली. तर वंजारीबहुल परिसर असलेल्या गोदाकाठमध्ये पंकजा मुंडे यांना पाचारण करण्यात आले.

मोदी, मुंडे यांची सभा महायुतीच्या डॉ. पवार यांना टेकू देतील, असा अंदाज होता. पण, दोन्ही सभा विशेषत: मोदी यांची सभा फुसका बार ठरली. मोदींची जादु निफाडमध्ये पूर्णत: ओसरल्याचे चित्र दिसले. शिवाय निफाड साखर कारखान्यावर साकाराणारा ड्रायपोर्टचा प्रकल्प ही डॉ. पवार यांना आधार देऊन शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT