Nashik Lok Sabha Election Result esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये धनुष्य चालणार की मशाल पेटणार!

Lok Sabha Election Result : नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या कौलाचा फैसला मंगळवारी खुलणार असून, अठराव्या लोकसभेत नाशिक व दिंडोरीचे प्रतिनिधित्व कोण करणार, यावर शिक्कामोर्तब होईल.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या कौलाचा फैसला मंगळवारी (ता. ४) खुलणार असून, अठराव्या लोकसभेत नाशिक व दिंडोरीचे प्रतिनिधित्व कोण करणार, यावर शिक्कामोर्तब होईल. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी विजयाची हॅट्‍ट्रिक केल्यास तो विक्रम ठरेल. दिंडोरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी विजय मिळविल्यास ते ‘जायंट किलर’ ठरतील. (Nashik Lok Sabha Election Result)

लोकसभेच्या निकालावरून चार महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कलदेखील स्पष्ट होणार आहे. नाशिकमध्ये शिंदेची की ठाकरेंची शिवसेना याचा देखील फैसला होणार आहे. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी गेल्या २० मेस मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही मतदारसंघांचे नेतृत्व करणारा खासदार कोण, याचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात कैद झाले.

मंगळवारी (ता. ४) सकाळी आठपासून अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रथम पोस्टल मतमोजणी होईल. दुपारी बारापर्यंत मतदारांचा कौल कळेल. दुपारी दोनपर्यंत निकाल हाती येतील. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही नाशिकप्रमाणेच प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक लोकसभेसाठी ६०.७५, दिंडोरी लोकसभेसाठी ६६.७५ टक्के मतदान झाले आहे. नाशिकमध्ये ३१, तर दिंडोरीत दहा उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिकमध्ये बहुसंख्य उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरा पक्षाचे राजाभाऊ वाजे व अपक्ष बाबाजी परिवाराचे शांतिगिरी महाराज यांच्यातच आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोणाचे मत खेचणार, हेदेखील महत्त्वाचे आहे. शांतिगिरी महाराजांच्या मतांचा टक्का महायुती की महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. (latest marathi news)

धनुष्य की मशाल

नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी सर्वाधिक उशिराने जाहीर करण्यात आल्याने नाशिक चर्चेत आले. महायुतीत प्रथम भाजपने जागेची मागणी केली. शिंदे गटाने परस्पर गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. शेवटी शिंदे गटाने बाजी मारत महायुतीत जागा खेचली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार गोडसे यांचे नाव जाहीर केले.

गोडसे यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. परंतु शेवटच्या टप्प्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराशी जवळपास बरोबरी केली. शिंदे सेनेकडे शिवसेनेसह भाजप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असली तरी प्रत्यक्षात कोणी किती काम केले, हे निकालातून स्पष्ट होईलच.

दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरा पक्षाचे राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाल्याने प्रचारात सुरवातीपासूनच त्यांची आघाडी राहिली. दोन्ही बाजू सक्षम असल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे धनुष्यबाण चालणार की राजाभाऊ वाजे यांची मशाल पेटणार हे मंगळवारी (ता. ४) दुपारी स्पष्ट होईल.

दिंडोरीत चुरस

दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये खऱ्या अर्थाने चुरस आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचे आव्हान आहे. भगरे यांनी सुरवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती.

डॉ. भारती पवार यांची उमेदवारी आधी जाहीर झाली असली तरी या मतदारसंघांमध्ये कांद्याचा प्रश्न अतिसंवेदनशील बनल्याने महायुतीसाठी ती डोकेदुखी ठरली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे ऐनवेळी सभा घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीदेखील भगरे यांच्यासाठी या मतदारसंघांमध्ये अधिक वेळ दिला.

एक्झिट पोल चर्चेत

सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देशभरात वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष समोर आणले. त्यामध्ये नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही विद्यमान खासदार पिछाडीवर असल्याचे दाखविण्यात आले. एक्झिट पोलचे निष्कर्ष खरे ठरल्यास नाशिककर बदलाच्या मूडमध्ये असल्याचे स्पष्ट होते. हाच मूड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कायम ठेवण्याचे आवाहन महाविकास आघाडीसमोर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT