Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीचा निकाल दुपारी बारापर्यंत, नाशिकला चार वाजणार

Lok Sabha Constituency : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्यानंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्यानंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दिंडोरीत एक ईव्हीएम आणि एकूण २६ फेऱ्या होतील. नाशिकमध्ये दोन ‘ईव्हीएम’ असल्यामुळे दुप्पट वेळ लागणार असून, एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. (Nashik Lok Sabha Election)

त्यामुळे दिंडोरीचा निकाल दुपारी बारापर्यंत, तर नाशिकचा निकाल दुपारी चारला जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वांत प्रथम गुलाल दिंडोरीचा उधळला जाईल. नाशिक लोकसभेसाठी ६०.७५, तर दिंडोरीसाठी ६.७५ टक्के मतदान झाले. पाच वर्षांत मतदारांची संख्याही वाढली आणि मतदानाचा टक्काही वाढला.

त्यामुळे एकूण मतदारांचे प्रमाण कमी दिसत असले तरी २०१९ च्या तुलनेत जास्त मतदान झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. मतदानानंतर आता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून विश्‍लेषण केले जात आहे. राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून जिंकण्याचा दावा केला जात आहे.

आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ जूनला सकाळी आठला मतमोजणीस प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल मतदारांनी केलेल्या मतदानाची मोजणी होईल. यानंतर ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त मतमोजणीस प्रारंभ होईल. (latest marathi news)

त्यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलावर उमेदवारांचा एक प्रतिनिधी असेल, याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला सहा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ प्रतिनिधी नियुक्त करावे लागतील. उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देणे बंधनकारक असेल. तसेच उमेदवार प्रतिनिधींचे छायाचित्र देणे आवश्‍यक असतील. मतमोजणीच्या दोन दिवस आधी ही प्रक्रिया करणे आवश्‍यक राहील.

त्यानंतर प्रतिनिधी बदलण्याची संधी उमेदवाराला मिळणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या लोकसभेचा निकाल २३ मे २०१९ ला जाहीर झाला होता. उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे उमेदवारांना मध्यरात्री प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते.

स्ट्राँग रूममध्ये ‘एसी’ बसवा

अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी होणार असल्याने त्याठिकाणी एसी बसवण्याची मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली. यासंदर्भातील पत्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. तसेच याठिकाणी २४ तास एका प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासाठी परवानगीही मागणार असल्याचे समजते.

अशा होतील फेऱ्या

दिंडोरी लोकसभा

मतदारसंघ.....मतदान केंद्र........ फेऱ्या

नांदगाव...........३३१...................२४

कळवण............३४५...................२५

चांदवड..............२९६..................२२

येवला................३२०..................२३

निफाड...............२७३..................२०

दिंडोरी...............३५७..................२६

एकूण................१९२२...............

नाशिक लोकसभा

सिन्नर................३२१..................२३

नाशिक पूर्व..........३२६.................२४

नाशिक मध्य........२९५.................२२

नाशिक पश्‍चिम.....४१०................३०

देवळाली.................२६९................२०

इगतपुरी..................२८९................२१

एकूण.....................१९१०

कर्मचारी संख्या

ईव्हीएम मतमोजणी-३७५

पोस्टम मतमोजणी-६०

टॅब्युलेशन-७५

एकूण-४८५

प्रत्येक मतमोजणी टेबलावर एक याप्रमाणे

एकूण पर्यवेक्षक- ८४

एकूण सहायक- ८४

मतमोजणी कर्मचारी- ८४

मायक्रो निरीक्षक- ८४

एकूण- ३३६ (याव्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT