Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : 18 मेपूर्वीच होणार साडेसहा हजार टपाली मतदान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांसह पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी मतदान करता येईल. याव्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी मतदान असलेल्या कर्मचाऱ्यांना १८ मेपूर्वीच टपाली मतदान करावे लागणार आहे. (Six and a half thousand postal voting held before May 18)

प्रशिक्षणाच्या ठिकाणी तशी व्यवस्था केली असून, दिंडोरीत प्रांत कार्यालयात १४ ते १७ मेदरम्यान मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. यंदा निवडणुकीत बहुतांश निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्याच ठिकाणी मतदान करता येणार आहे.

परंतु त्या व्यतिरिक्त असलेल्या सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा दिली जाणार असून, ११ आणि १२ मेस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणीच टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे १८ मेपूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान पूर्ण केले जाणार आहे. १० मेपासून टपाली मतदानाची प्रक्रिया विविध मतदारसंघांत राबविण्यात येईल.

या कर्मचाऱ्यांचे तसेच सैनिक आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठांचेही टपाली मतदान करून घेतले जाणार आहे. यात सैनिकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात येतील. त्यांच्याकडून मतदान करून घेऊन वरिष्ठांच्या स्वाक्षरीने सीलबंद करून त्या मतमोजणीच्या अर्धा तास आधी म्हणजे ४ जूनला सकाळी साडेसातपर्यंत निवडणूक यंत्रणेकडे पोहोचणे बंधनकारक आहे. ज्येष्ठांच्या घरी निवडणूक विभागाचे प्रतिनिधी जाऊन ते मतदान करून घेतील. (latest marathi news)

जिल्ह्यात २१ हजार १४० निवडणूक कर्मचारी

जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य, बाह्य व बागलाण येथील चार हजार ८०० मतदान केंद्रांसाठी एकूण २१ हजार १४० निवडणूक कर्मचारी प्रत्यक्ष निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सेवा बजावतील. यातील १६ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्याच ठिकाणी मतदानाची संधी देण्यात आली आहे.

उर्वरित सहा हजार ४१० कर्मचारी मतदारांना त्यांच्या निवासी मतदारसंघाच्या बाहेर नियुक्ती केल्याने टपाली मतदान करावे लागेल. तसेच, ८५ वर्षांवरील एक हजार २८४ मतदारांना टपाली मतदान करता येणार आहे. २१२ दिव्यांग टपाली मतदान करतील.

अधिकारी ‘ऑन फिल्ड’

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे हे स्वत: कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी (ता. ११) कळवण येथील आपाश्र लॉन्समध्ये उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता. १२) दिंडोरीतील कर्मचाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील. जास्तीत जास्त मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांनी केले आहे.

विधानसभानिहाय कर्मचारी

नांदगाव- ८२४

कळवण-सुरगाणा- ४०४

चांदवड-देवळा- ३४६

येवला- २३८

निफाड- ५०२

दिंडोरी-पेठ- ४७६

एकूण- २,७९०

सिन्नर- ३७४

नाशिक पूर्व- ९१२

नाशिक मध्य- २३४

नाशिक पश्‍चिम- ३३९

देवळाली- १८४

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर- २७१

एकूण- २,३१४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT