Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातील सस्पेन्स आजही कायम राहिला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जागा मिळविण्यासाठी मुंबईत दाखल झालेले इच्छुक रिकाम्या हाताने परतले. दोन दिवसात नाशिकच्या जागे संदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे नाशिकच्या जागेसंदर्भात आज विविध चर्चा घडून आल्याने राजकीय वातावरण तापले. (Nashik Lok Sabha Election Suspense continues in constituency aspirants return to Nashik marathi news)
नाशिक लोकसभेच्या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सस्पेन्स कायम ठेवण्यात आला. नाशिकची जागा पारंपरिक पद्धतीने शिवसेनेकडे असल्याने शिंदे घाटाकडून जोरदार दावा करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या ठाणे व मुंबई येथील शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून दबाव तंत्र अवलंबिले.
परंतु त्याचा उपयोग झाला नाही स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेच्या वतीने राज्यातील आठ जागांची घोषणा केली मात्र त्यात नाशिकचा समावेश नव्हता. त्यामुळे शिंदे सेनेचा आत्मविश्वास दिवसेंदिवस खालावत चालला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जोरदार चर्चेत आल्याने. शिंदे सेनेचे धाकधूक वाढली. त्यामुळे शिंदे सैन्याकडून पुन्हा आक्रमकपणे नाशिकच्या जागेवर दावा ठोकण्यात आला. (latest marathi news)
राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथील छगन भुजबळ यांचे नाव अद्यापही जाहीर झाले नाही. त्यामुळे प्रचाराची ठोस अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेता आली नाही. नाशिकच्या जागी संदर्भात मुंबईतून सर्व फिल्डिंग लावली जात आहे, त्यामुळे इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले. संध्याकाळपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे इच्छुक रिकाम्या हाताने परतले. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक खालावू नये म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा करण्यात आला.
दोन दिवसात निर्णय शक्य
नाशिकच्या जागी संदर्भातून दिवसाचे निर्णय शक्य होणार आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या शिंदे गटाचा महायुतीकडून दावा आहे. सध्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड दिसत आहे. दोन दिवसात नाशिकच्या जागेसंदर्भात निश्चिती होऊन उमेदवाराची देखील घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.