District Chief Vijay Karanjkar esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : विजय करंजकर अद्याप वेटिंगवरच !

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्या नंतर गेल्या दीड वर्षांपासून खासदारकीच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रचार करणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना अद्यापही ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले आहे. ( Nashik Lok Sabha Election Vijay Karanjkar still waiting marathi news)

मातोश्रीकडून त्यांना समिटासाठी अद्यापही बोलावणे आले नाही. शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटेल व खासदारकीचे उमेदवार म्हणून विजय करंजकर हे राहतील असे अनेकदा जाहीर केले मात्र ऐनवेळी करंजकर यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे करंजकर यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवत निवडणूक लढविणार व पाडणार देखील असे खुले आव्हान दिले. (nashik political news)

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाजे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी करंजकर यांची नाराजी दूर करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले परंतु अद्यापही करंजकर यांची नाराजी कायम आहे.

अद्याप दोन्ही विजय दूरच

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार त्यामुळे तो विजय आपला आहेच व नाराज असलेले विजय करंजकर हे दोन्ही विजय आपलेच आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले होते मात्र यातील एक विजयाची निश्चिती मतपेटीतून बाहेर पडणार आहे तर विजय करंजकर यांना अद्यापही वेटिंगवर ठेवण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी दोन्ही विजय दूर असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT