Nashik Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वी उमेदवारीसाठी नकार देणारे अनेक इच्छूक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहे. यात माकपाकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले माजी आमदार जे. पी. गावित यांचा तुतारी चिन्हावर लढण्याबाबत महाविकास आघाडींतर्गत प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. (Nashik Lok Sabha Election war for candidacy from Maha Vikas Aghadi marathi news)
भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष एन. डी. गावित यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीकडून आग्रह सुरू झाला असल्याचे वृत्त आहे. याशिवाय माजी आमदार रामदास चारोस्कर, सुनिता चारोस्कर यांच्या उमेदवारीसाठी अनेकांनी फिल्डींग लावल्याचे बोलले जात आहे. भाजपने येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा संधी देत रिंगणात उतरविले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांचा प्रस्ताव स्थानिक पातळीवरून प्राप्त झाल्याचे खुद्द पवार यांनी नाशिक दौऱ्यात सांगितले होते. त्यामुळे भगरे यांची उमेदवारी अंतिम मानली जात होती. परंतू, भगरे यांच्या नावाबाबत मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून साशंकता उपस्थित होऊ लागली. त्यामुळे शरद पवार यांनी तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.
यासाठी पवार यांनी स्वतः लक्ष घालत उमेदवारांची चाचपणी सुरू केली. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना बोलावून पवार यांनी स्वतः चर्चा केली. भाजपचे माजी खासदार चव्हाण यांनी देखील पवार यांची भेट घेतल्यानंतर तेदेखील उमेदवारीसाठी आग्रही असून, त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन देखील केले. याच घडामोडीत जे. पी. गावित यांनी या मतदारसंघासाठी आग्रह धरला. (latest marathi news)
मात्र, जागा वाटप निश्चित झालेले असल्याने ही जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर, त्यांचे पुत्र माजी सभापती इंद्रजीत गावित यांना पक्षाकडून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यास उमेदवारी देण्याऐवजी थेट जे. पी. गावित यांनाच उमेदवारी देऊन तुतारी चिन्हावर निवडणुकीत उतरविण्याबाबतचा मतप्रवाह पुढे आला.
या पार्श्वभूमीवर, मतदारसंघातील शिवसेनेचे (उबाठा गट) तसेच काँग्रेसच्या काही माजी आमदारांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेत चर्चा केली. या चर्चेत जे. पी. गावित यांनी तुतारी चिन्हावर लढविण्याबाबत चर्चा करत त्यांची मते समजावून घेतली. याशिवाय, भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले एन. डी. गावित यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या एका गटाने केली.
त्याबाबत पक्षातंर्गत चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर, सुनिता चारोस्कर यांच्या उमेदवारीसाठी त्यांचे समर्थक आग्रही झाले असून त्यांनीही पवार यांची भेट घेत त्यांना साकडे घातल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने दोन दिवसात उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळयात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
''महाविकास आघाडीत दिंडोरीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी पवार यांची भेट घेत त्यांना साकडे घातले आहे. माजी आमदार गावित यांची देखील भेट झाली आहे. एन. डी. गावित यांचाही प्रस्ताव आला आहे. याबाबत दोन दिवसात उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.''- कोंडाजी आव्हाड (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.