Nashik News : जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. दिंडोरी मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरली आहे. मात्र, मतदानात जिल्ह्यातील महिला बचत गटाचा मोठा वाटा राहिला आहे. जिल्हाभरातील २८ हजार २३४ बचत गटातील दोन लाख ८२ हजार ३४० महिलांपैकी तब्बल दोन लाख ५४ हजार ६५१ महिलांनी (९२ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. (Women Savings Group leading in district polls)
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेकडून मतदान जनजागृती करण्यात आली होती. यात विभागाकडून प्रामुख्याने गृहभेटी देत महिलांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या जनजागृतीचा चांगला परिणाम दिसून आला आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला बचत गटांनी सकाळी अकराच्या आत मतदान करून घेण्याचा संकल्प केला होता.
त्यानुसार सोमवारी (ता. २०) सकाळी बचत गटाच्या ग्राम संघ, प्रभात संघ, गावनिहाय प्रेरिका, बॅंक सखी, कृषी सखी, पशू सखी यांनी समन्वयाने एकत्र येत आपले कर्तव्य बजाविले आहे. त्यासाठी महिला बचत गटांनी वेगवेगळे रंगाच्या साड्यांचा कोडवर्क केला होता. त्या-त्या बचत गटातील महिलांनी दिलेल्या रंगाच्या साड्या परिधान करत एकत्रित मतदान केले. (latest marathi news)
झालेल्या मतदानाची विभागाकडे नोंद देखील झाली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २८ हजार २३४ महिला बचतगट कार्यरत आहे. प्रत्येक गटात साधारणः दहा ते १२ महिला आहे. त्यानुसार सर्व बचत गटांमध्ये मिळून दोन लाख ८२ हजार ३४० महिला आहेत. यापैकी दोन लाख ५४ हजार ६५१ महिलांनी प्रत्यक्षात मतदानाच हक्क बजाविला आहे.
विभागाकडून मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. महिला बचत गटाचा वाटा मोठा असावा, असा संकल्प केला होता. त्यानुसार महिलांनी एकजूट दाखवत मतदानात सहभागी झाल्याचे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.