Nashik Lok Sabha election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : शिवसेना (उबाठा) पक्षाला मुस्लिम, दलित मतांची साथ; उद्धव ठाकरे मराठी टक्का गमावत आहेत का?

Lok Sabha Election : जिथे-जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून आले, तिथे काँग्रेसची ‘वोट बँक’ असलेल्या मुस्लिम आणि दलित मतांनी त्यांना साथ दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ उमेदवार राज्यात लोकसभेच्या रिंगणात निवडून आले. परंतु या निवडणुकीपूर्वी शिवसेना मराठी माणसाचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. मराठी मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवल्याचे या वेळी दिसून येत आहे. जिथे-जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून आले, तिथे काँग्रेसची ‘वोट बँक’ असलेल्या मुस्लिम आणि दलित मतांनी त्यांना साथ दिली. (Nashik Lok Sabha Election)

परिणामी मराठी टक्का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत असल्याचे दिसून येते. खासकरून मुंबईतील हे चित्र अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक ही शिवसेनेची बलस्थाने समजली जातात. शिवसेनेत फूट पडून मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिला. दोन शिवसेना पक्ष अस्तित्त्वात आल्यानंतर असली-नकली शिवसेना वाद उफाळून आला.

खासकरून लोकसभेच्या रणांगणात या मुद्यावर भाषणे रंगली. वाद आणि प्रतिवाद कितीही झाली तरी लोकभावना लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, तिथे मुस्लिम आणि दलित मतदारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचे स्पष्ट होते. थोडक्यात उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक असलेल्या मुस्लिम, दलित मतांवर यापुढे अवलंबून राहावे लागणार आहे.

वस्तुतः हा पक्षासाठी मोठा धोका असल्याचेही मानायला हवे. युती आणि आघाडी कायमस्वरूपी राजकारणात टिकत नसते, ही आजवरची स्थिती राज्याने अनुभवली आहे. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचे हक्काचे मराठी मतदार यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकलेले दिसून येतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडल्यास मुस्लिम, दलित मतदारही त्यांच्यापासून दुरावले जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. (latest marathi news)

काँग्रेसची महत्त्वाकांक्षा राज्यात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे तीन पक्षांचा समन्वय न झाल्यास चित्र बदलण्यास फार वेळ लागणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसमध्ये नेतृत्व नसताना ते पुढे आहेत. कमी जागा लढूनही काँग्रेसचे यश झळाळून निघाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आत्मपरिक्षण करायला हवे.

काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यास जे मतदान ठाकरे गटाला झाले आहे, ते सरकेल. मराठी आणि हिंदुत्त्वाची मते ठाकरे गटाने गमावलेली असल्याचे चित्र आहे. अगदी स्ट्राइक रेटचा विचार केला तरी १५ जागा लढवून सात जागा जिंकणारे एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसतात.

आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपुढे आव्हान आहे. हे आव्हान दलित समाजात संविधान आणि आरक्षणाबाबत पसरवलेले गैरसमज दूर करण्याचे आहे. काँग्रेस आणि शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला या गैरसमजाचा फायदा होईल, पण शिवसेनेला मात्र तोटा होऊ शकतो, हे शिवसेनेने विसरून चालणार नाही.

नाशिकमध्ये काय घडले?

नाशिकमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपचा हवा तसा फायदा झाला नाही. बूथप्रमुख, पक्षप्रमुखांची अस्तित्त्वाचीही जाणीव झाली नाही. भाजपला आणि घटक पक्षही फक्त मोदी ब्रॅन्डवर लढले. घमेंड, मतदारांना गृहित धरणे, दुर्लक्ष करणे आणि चारशे पारची घोषणा महायुतीच्या अंगलट आली. चारशे पार पण कशासाठी? हे स्पष्टच केले नाही. चारशे पार संविधान बदलण्यासाठी, असा अर्थ लावला गेला.

एकनाथ शिंदे सरस

या सगळ्या कोलाहलात एकनाथ शिंदे सरस ठरले. १५ जागा लढून सात जिंकून त्यांनी आपली प्रतिष्ठा जपली आहे. केंद्रातही महत्त्व वाढलं आहे. नितीशबाबू, चंद्राबाबू जरी भविष्यात गेले तरी सात खासदारांची भूमिका बऱ्याचअंशी महत्त्वाची ठरणार आहे. महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी तटस्थ राहिली. त्यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनीही काम केले नाही. या पक्षाचा उपयोग शून्य असल्याची भाजप कार्यकर्त्यांची भावना झाली. राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कुठेही काम केले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT