Shivsena vs Congress esakal
नाशिक

Shivsena vs Congress: नाशिक लोकसभा आम्हीही लढणार; काँग्रेसच्या दाव्याला शिवसेनेचे जोरदार उत्तर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असून त्या अनुषंगाने दावे-प्रतीदावे केले जात आहेत. मागील आठवड्यात काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दोन्ही जागा लढविण्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाशिकची जागा लढविण्याचा निर्धार करत आपलाही हक्क असल्याचे सांगितले.

काँग्रेसच्या निर्णयाला अप्रत्यक्ष विरोध केला असून दिंडोरीची जागा देखील लढविण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या दोन्ही जागांवरून महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटले आहे. (Nashik Lok Sabha we too will fight Shiv Sena strong reply to Congress claim political)

मागील दोन वर्षात राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचा एक मोठा गट फुटून सत्तेत सहभागी झाला तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा गट देखील फुटून सत्तेत सहभागी झाला आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांच्या बाजूने जणाधार वाढत आहे. त्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील बाजी मारल्यानंतर काँग्रेसच्या सत्तेच्या अनुषंगाने महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला स्थान मिळाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने निरीक्षक म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. पाटील यांनी नुकतीच नियुक्तीच्या अनुषंगाने नाशिकमध्ये काँग्रेस भवन येथे बैठक घेतली. नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभेच्या जागा लढविणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परस्पर घोषणा लागली जिव्हारी

राज्यांत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे असे असताना परस्पर नाशिकच्या दोन्ही लोकसभेच्या जागा लढविण्याचा निर्णय पाटील यांनी जाहीर केल्याने सदरची बाब शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे.

त्यामुळे शिवसेनेने भूमिका जाहीर करताना नाशिक लोकसभा मतदार संघाची जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त करताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे शिवसेनेचे उमेदवार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील स्थानिक पातळीवर सूचना देताना शिवसेनेकडून स्थानिक व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकालाच संधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

अडचणीच्या काळात पक्षाला खंबीरपणे साथ देणाऱ्यांनाच आता निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल त्या अनुषंगाने विजय करंजकर हेच उमेदवार असल्याचे शिवसेनेने देखील जाहीर केले आहे. यामुळे वादाला तोंड फुटले असून नाशिकमध्ये महाविकास आघाडीत निवडणुकीपूर्वीच मिठाचा खडा पडल्याचे मानले जात आहे.

एकनिष्ठांना मोठे गिफ्टच

लोकसभा विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता शिवसेनेच्या अडचणीच्या काळात ज्यांनी खंबीरपणे साथ दिली त्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे.

किंबहुना निष्ठावंतांचा प्राधान्याने विचार केला जाईल, त्यानंतर अन्य बाबींचा विचार केला जाईल असे शिवसेनेच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची एकनिष्ठ राहिलेल्यांना एक प्रकारे गिफ्ट मानले जात आहे.

"नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना लढविणार असून विषय करंजकर हेच उमेदवार आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला तरी फरक पडणार नाही." - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ती भिंत तोडणारच.. ५०% आरक्षणावरुन राहुल गांधींचा घणाघात, सविधान सन्मान संमेलनात केला हल्लाबोल

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, आता भारतीय इंजिनीअर्सच्या नोकऱ्या जाणार का?

Ranji Trophy 2024: ६०००+ धावा अन् ४००+ विकेट्स; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय, पण टीम इंडियात संधी नाही

SCROLL FOR NEXT