Diverted Traffic esakal
नाशिक

Nashik: अंबड मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक मार्गात बदल! लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे नियोजन

Nashik News : या पार्श्वभूमीवर वेअर हाऊसकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार असून, वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) अंबडऔद्यागिक वसाहतीतील वेअर हाऊसमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर वेअर हाऊसकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार असून, वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. (Nashik loksabha vote counting Change in traffic route)

शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मंगळवारी (ता.४) वाहतूक मार्गातील बदलासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मंगळवारी पहाटे चार वाजेपासून रात्री दहापर्यंत वेअर हाऊसकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांनाच प्रवेश बंद केलेल्या रस्त्यावरून जाण्यास परवानगी असेल. तसेच, पोलिस सेवेतील, अग्निशमन दलाची वाहने यांच्यासाठीही नियम शिथिल आहेत.

प्रवेश बंद मार्ग असे

- जेमीनी इंस्ट्राटेक लिमिटेड ते अंबड वेअर हाउसपर्यंत जाणारी वाहतूक

- अंबड वेअर हाउस ते पॉवर हाउस जाणारा रस्ता

- ग्लॅक्सो कंपनी ते संजीवनी बोटॅनिकल नर्सरीकडे अवजड वाहतुकीला प्रवेश बंद

- अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद

(latest marathi news)

पर्यायी मार्ग असे

- जेमीनी इंस्ट्राटेक लिमिटेडकडून गरवारे मार्गे इतरत्र मार्गस्थ

- गरवारे ते पावर हाऊस मार्गे एक्स्लो पॉइंट मार्गाने इतरत्र मार्गस्थ

- अंबड गावाकडून अजिंठा हॉटेलमार्गे एक्स्लो पॉइंटकडून इतरत्र मार्गस्थ

वाहनांसाठी पार्किंग असे

- महायुतीच्या उमेदवारांसाठी पार्किंग : चुंचाळे पोलिस चौकीच्या बाजुचे मैदान : पाथर्डी फाटा-गरवारेमार्गे चुंचाळे चौकी

- महाविकास आघाडी उमेदवारांसाठी पार्किंग : अंबड पॉवर हाउसमोरील जागा : पाथर्डी फाटा-सिडको हॉस्रपिटलमार्गे अंबड गावातून पॉवर हाउस

- इतर व अपक्ष उमेदवारांसाठी पार्किंग : फिनोटेक्स कंपनी, नेक्सा शोरुमसमोर : पाथर्डी फाटा-सिडको हॉस्पिटल-फ्रेशअप बेकरीमार्गे

"अंबड एमआयडीसीतील वेअर हाऊस येथे मतमोजणी होणार आहे. त्यादृष्टीने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्याचा वापर करावा. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT