Share Trading Fraud esakal
नाशिक

Nashik Share Trading Fraud: शेअर ट्रेडिंगमधून नफ्याच्या हव्यासापोटी गमावली जमापूंजी! सायबर भामट्यांनी घातला तब्बल 95 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Share Trading Fraud : शहरातील एका शेतकऱ्यासह तिघांना शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूकीतून जादा परताव्याचे अमिष दाखवून तब्बल ९५ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित टेलिग्राम अकाउंटधारकांविरोधात शहर सायबर पोलिसात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Loss of capital in pursuit of profit from share trading)

फसवणूक झालेल्या शेतकऱ्याच्या फिर्यादीनुसार, जुलै २०२३ ते मे २०२४ या दरम्यान, व्हाटस्अॅप आणि टेलिग्राम आयडीवरुन संशयित सायबर भामट्यांसह टेलिग्राम अकाउंटधारकांनी संपर्क साधला होता. टेलिग्रामसह त्यावरील विविध चॅनलला अॅड करुन घेत शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी प्रलोभने सायबर भामट्यांनी दाखविली होती.

या प्रलोभनांना भुलून शेतकऱ्यासह तिघे संशयित भामट्यांच्या अमिषाला बळी पडले. त्यानंतर भामट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सअॅपवर ज्वाॅईन करण्यास सांगितले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंगसाठी एक अॅप डाऊनलोड करायला सांगितले. शेतकरी व इतरांनी अॅप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. (latest marathi news)

यानंतर त्यांना काही प्रमाणात मोबदला देण्यात आला पण तो बँक खात्यावर दिसत होता. मोठी रक्कम अॅपवर आभासी स्वरुपात दिसत असल्यामुळे यांनी शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत असल्याचे पाहून अधिक गुंतवणूक केली. या कालावधीत त्यांनी ९४ लाख ८६ हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग केले.

नंतर मात्र जेव्हा त्यांनी नफ्याची दिसत असलेली रक्कम काढण्यासाठी प्रयत्न केले असता, ते होत नव्हते. त्यांनी सायबर भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मात्र पैसे मिळणार नसल्याची खात्री झाल्यावर शेतकऱ्यासह तिघांनी शहर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT