Nashik Maha Sanskruti Mahotsav : महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी शनिवारी (ता.२) ‘मंडळ कलाकारी आहेच’ या संस्थेने गजर हरिनामाचा नृत्य नाटिका, यशवंत व्यायामशाळा, नाशिकतर्फे मल्लखांब प्रात्यक्षिके तसेच कला स्त्री ग्रुप, नाशिकने आम्ही महाराष्ट्राच्या लेकी व ऊर्जा बँड गीतांच्या कार्यक्रमांचे जोरदार सादरीकरण केले. या तीनही कलाकृतींना प्रेक्षकांनी मनस्वी दाद दिली. (Nashik Maha Sanskruti Mahotsav Performance of Traditional Wari marathi news)
महासंस्कृती महोत्सवात नाशिक येथील संस्थेकडून गजर हरिनामाचा या नृत्यनाटिकेने सुरवात झाली. अभिजित कुरुलकर या पात्राभोवती या नृत्यनाटिकेचे कथानक गुंफले आहे. त्याच्या आयुष्यातील स्वत:च्या आजीचे स्थान, तिच्या आजारपणात तिला भेटण्यासाठी पंढरपूर येथे जाण्याची त्याची तगमग, वारीसोबत पंढरपूरपर्यंत त्याला घडलेला प्रवास व चंद्रभागेच्या तीरी पोहोचल्यावर विठ्ठलाच्या स्वरूपाची त्याला येणारी प्रचिती व साक्षात होणारे विठ्ठलाचे दर्शन हा सर्व प्रवास व नाटकातील प्रसंग, विठ्ठलाच्या गीतांवरील नृत्ये यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
यशवंत व्यायाम शाळा, नाशिकतर्फे मल्लखांबाची विविध प्रात्यक्षिके १३ मुली व १३ मुले यांनी सादर केली. यात जिमनॅस्टिक, योगा, विविध आसने, पिरॅमिड असे विविध चित्तथरारक प्रकार विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले. (latest marathi news)
यानंतर ‘आम्ही महाराष्ट्राच्या लेकी’ कार्यक्रमातून कला स्त्री ग्रुप यांनी मंगळागौरीच्या फुगडी, दंड फुगडी, लाटणे फुगडी, कोंबडापान, गोफ, होडी, गाठोड, भिंड मोडग सई, झुकू लुकु, ओगोटा पागोटा असे विविध खेळांचे प्रकार प्रेक्षकांसमोर सादर केले.
ऊर्जा बँडच्या माध्यमातून ‘सा रे ग मा’ तील विजेता गायक रवींद्र खोमणे, मृण्मयी पाठक व ओंकार भंडारे यांनी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व त्यांना साथ देणाऱ्या नयनरम्य नृत्य आविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात मिलिंद जोशी यांनी निवेदन केले. गायक कलाकारांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.