Assembly Elections 2024 esakal
नाशिक

Assembly Election : महाविकास आघाडी, महायुतीकडून विधानसभेचा शंखनाद! ‘उबाठा’सह राष्ट्रवादी व भाजपची आघाडी

Nashik News : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा शंखनाद नाशिकमध्ये महाविकास आघाडी व महायुतीकडून करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा शंखनाद नाशिकमध्ये महाविकास आघाडी व महायुतीकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचा ‘उबाठा’ व भाजपकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षानेदेखील नाशिककडे लक्ष केंद्रित केले असून बैठकांवर जोर दिला जात आहे.

त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार पक्ष व शिवसेनेच्या शिंदे पक्षाकडून निवडणुकीच्या दृष्टीने फारशी आघाडी घेतली गेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नाशिकमध्ये नुकतीच पार पडली. त्यामुळे आता पुढील म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीकडून बैठकांचा जोर अधिक दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तीन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी राजकीय भाष्य केले नाही, मात्र त्यानंतर लगेचच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जनसंवाद यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली.

या यात्रेच्या निमित्ताने पाटील यांनी नाशिक शहरातील चार मतदारसंघासह ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या याद्या मागविल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी होत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनदेखील तयारी सुरू आहे. नाशिक पूर्व व देवळाली मतदारसंघात बैठक घेण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार रवींद्र मिर्लेकर शहरात दाखल झाले आहे. (latest marathi news)

पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघासाठी ते शुक्रवारी (ता. २६) शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसापूर्वी नाशिक दौरा केला. त्यात त्यांनी निवडणुकीवर भाष्य केल्याने काँग्रेसकडून देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या.

त्याअनुषंगाने काँग्रेसकडूनदेखील तयारी सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे पक्षाकडे मालेगाव बाह्य व नांदगाव विधानसभा मतदारसंघ ताब्यात आहे. त्या व्यतिरिक्त शिंदे पक्षाला नाशिक शहरातदेखील निवडणूक लढवायची आहे. मात्र अद्यापपर्यंत उमेदवार निश्चिती झाली नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाकडून मात्र विधानसभा निवडणुकी संदर्भात फारशा हालचाली दिसून येत नाही.

भाजपच्या विभागनिहाय बैठका

भाजपकडून विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हानिहाय संघटनात्मक प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी संघटनात्मक प्रभारी म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवारी (ता. २७) त्यांच्या उपस्थितीत विधानसभानिहाय बैठका होणार आहेत.

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेऊन महायुतीतल्या घटक पक्षांना कोणत्या जागा सोडायचा याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठवला जाणार आहे. संघटनात्मक प्रभारींची नियुक्ती करताना नाशिक शहर, नाशिक उत्तर जिल्हा, नाशिक दक्षिण जिल्हा व मालेगाव जिल्हा असे चार विभाग पाडण्यात आले आहेत.

त्यानुसार या चारही विभागातील जिल्हाध्यक्ष, आमदार, सरचिटणीस, चिटणीस, कार्यकारिणी सदस्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. बैठकीत १५ विधानसभांचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाईल. उत्तर महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे.

प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदारांना बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा, मंडल स्तरावरील स्थिती, शक्ती केंद्रांची मजबुती, सरकारी योजनांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT