MAHAGENCO News esakal
नाशिक

MAHAGENCO News : महानिर्मितीची ऐतिहासिक विक्रमी कामगिरी! गेल्या वर्षाच्या तुलनेत औष्णिक वीजनिर्मितीत 7.85 टक्के वाढ

Nashik News : वीज क्षेत्र झपाट्याने बदलत असल्याने वीज ग्राहकांना रास्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी दिवसेंदिवस स्पर्धा वाढतच आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वीज क्षेत्र झपाट्याने बदलत असल्याने वीज ग्राहकांना रास्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी दिवसेंदिवस स्पर्धा वाढतच आहे. त्यानुसार महानिर्मितीने तांत्रिक आणि वाणिज्यिक बाजूंवर लक्ष्य केंद्रित करून कार्यक्षम वीज उत्पादनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात महानिर्मितीचे वीज उत्पादन ऐतिहासिक ६१,४३९ दशलक्ष युनिट्स इतके झाले आहे. (Nashik MAHAGENCO historical record achievement news)

त्यात भुसावळ ७,५७५.२३५ दशलक्ष युनिट्स, चंद्रपूर १६,२७९.६६९ दशलक्ष युनिट्स, पारस ३,५९५.९८३ दशलक्ष युनिट्स, कोराडी १३,२००.३०१ दशलक्ष युनिट्स, खापरखेडा ८,२६७.४०९ दशलक्ष युनिट्स, नाशिक २,६४७.३७६ दशलक्ष युनिट्स, परळी ४,१०४.२१६ दशलक्ष युनिट्स आणि उरण १,७६९.०३२ दशलक्ष युनिट्स, जलविद्युत प्रकल्प ३,६६७.८३३ दशलक्ष युनिट्स, सौरऊर्जा प्रकल्प ३३२.१०५ दशलक्ष युनिट्स इतकी विजेची निर्मिती केली आहे.

या यशस्वी कामगिरीबाबत महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी महानिर्मितीच्या अधिकारी, अभियंता, तंत्रज्ञ, कामगार, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. मागील वर्षाची आकडेवारी पाहिली असता सन २०२२-२०२३ मध्ये ५७,७३४ दशलक्ष युनिट्स अशी ५.९८ टक्के वाढ, तर सन २०२३-२०२४ मध्ये ६१,४३९ दशलक्ष युनिट्स आणि ७.८५ टक्के वाढ झाली आहे, हे विशेष.

त्रिसूत्री ठरली गेमचेंजर

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी त्रिसूत्री प्रोग्राम आखून दिला. त्यात संचाच्या कार्यक्षमता वाढीसाठी भरपूर प्रयत्न केले. जसे प्रभावी इंधन वापर व व्यवस्थापन, सहाय्यकारी वीजवापर कपात, आर्थिक शिस्त, काटकसर, १० टक्के संचलन सुव्यवस्था खर्चात कपात, देखभाल दुरुस्तीबाबत गुणवत्ता, संचाची उपलब्धता वाढविण्यावर भर, उष्मांक दरात वाढ तसेच मिशन झीरो डिसअलाउन्ससारख्या उपक्रमांतून थेट कार्यकारी अभियंता यांच्याशी सुसंवाद साधून महानिर्मितीच्या सर्व संचांची उपलब्धता वाढण्यास मोठा हातभार लागला.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक, कार्यकारी संचालक यांनी उत्तम नियोजन करून क्षेत्रीय मुख्य अभियंते, उपमुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते यांच्याशी रोज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे आभासी बैठका, प्रत्यक्ष वीज केंद्र स्थळी वेळोवेळी दौरे करून आढावा घेतल्याने सूक्ष्म नियोजन यशस्वी झाले.

सद्यस्थितीत महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये २२ लाख टन कोळसा साठा उपलब्ध असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन लाख टन जास्त कोळसा साठा आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून महत्तम वीज उत्पादनाकरिता महानिर्मितीकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध आहे.  (latest marathi news)

महानिर्मितीची शाश्वत हरित उर्जेत भरीव कामगिरी

महानिर्मितीने या वर्षभरात सुमारे आठ हजार मेगावॉटपेक्षा अधिकच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांचे नियोजन केले असून, त्यात सौरऊर्जा, तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, पवनऊर्जा, उदंचन जलविद्युत केंद्र, हरित हायड्रोजन प्रकल्पाचा समावेश आहे. या संदर्भात देशातील नामांकित सोलर पॅनल उत्पादक आणि विकासक यांचे समवेत नुकतेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, ज्यास उत्तम प्रतिसाद लाभला.

पर्यावरणपूरक यंत्रणेचा अवलंब

महानिर्मितीने २३ संचांसाठी एफ.जी.डी. यंत्रणा लावण्याचे निश्चित केले, तसेच भुसावळ येथे सौरऊर्जेच्या सहाय्याने २० घनमीटर प्रतितास क्षमतेचा हरित हायड्रोजन प्रकल्प उभारत आहे. याचबरोबर चंद्रपूर येथे ५० दशलक्ष घनमीटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसेच, कोल पाईप कन्व्हेयरद्वारे खाणीतून थेट कोळसा वीज केंद्रात आणण्याची प्रणाली कार्यान्वित झाली असून, कोराडी-खापरखेडा येथे कोल पाईप कन्व्हेयर प्रणाली टप्पा १ सुरू झाला आहे.

वीज केंद्रांची उल्लेखनीय कामगिरी

• २५० मेगावॉट, पारस संच चार मधून सलग २५८ दिवसांपेक्षा जास्त वीज उत्पादन.

• ५०० मेगावॅट चंद्रपूर संच क्रमांक ८ मधून २३४ दिवस अखंडित उत्पादन.

• महानिर्मितीच्या सात संचांमधून १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस अखंडित वीज उत्पादन. (भुसावळ संच क्र. ५, कोराडी संच क्र. ६ व ९, चंद्रपूर संच क्र. ३, पारस संच क्र. ३, परळी संच क्र. ६, नाशिक संच क्र. ४)

• महानिर्मितीचे सर्वोच्च औष्णिक वीज उत्पादन ८,४६० मेगावॉट.

• २९ जानेवारी २०२४ ला सकाळी ०९.४५ ला १० हजार ४०३ मेगावॉट इतके विक्रमी वीज उत्पादन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची झाली ऑनलाइन बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT