Maharashtra Police Recruitment esakal
नाशिक

Maharashtra Police Recruitment : पोलीस भरती पुन्हा रखडली! EWS संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Police Recruitment : महाराष्ट्र पोलीस दलाची भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना प्रवर्ग बदलाचे हमीपत्र घेण्याच्या सूचना केल्या असता त्यास उमेदवारांनी नकार दिला आहे. यासंदर्भात आयुक्तालयाने पोलिस महासंचालक कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितल्याने सदरील भरती प्रक्रिया रखडण्याची चिन्हे आहेत. (Nashik Maharashtra Police recruitment stopped again)

महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रिया गेल्या डिसेंबर महिन्यात प्रारंभ झाला. परंतु लोकसभा निवडणुकीची आचासंहितेमुळे प्रक्रिया रखडली होती. गेल्या जुलैमध्ये आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, या भरतीसाठी मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज केलेले आहेत.

अशा उमेदवारांना आता सामाजिक व शैक्षणिकदृट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) वा खुल्या प्रवर्गातून हमीपत्र या उमेदवारांकडून घेण्यासंदर्भातील सूचना अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने केली आहे. मात्र, ऐनवेळी बदल झालेल्या या सूचनेसंदर्भात उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, ज्यावेळी भरती जाहीर झाली वा अर्ज सादर करतेवेळी या स्वरुपाची कोणतीही अट लागू करण्यात आलेली नसल्याने बाब उमेदवारांनी निदर्शनास आणून दिली आहे. परिणामी, चार उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिल्याने यासंदर्भात शहर आयुक्तालयाने महासंचालक कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले असून, त्याकडे पोलीस आयुक्तालय व उमेदवारांचे लक्ष लागून आहे. (latest marathi news)

अपर पोलीस महासंचालक कार्यालयाची सूचना

अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने (प्रशिक्षण व खास पथके विभाग) शहर पोलिस आयुक्तालयास १६ तारखेला पत्र देत, ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलेल्या ‘मराठा’ उमेदवारांना ईडब्ल्यूएसऐवजी एसईबीसी, ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गापैकी एका प्रवर्गाची निवड करावी आणि संबंधित उमेदवाराने त्यासंदर्भातील हमीपत्र देण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्याचप्रमाणे, ‘एसईबीसी’ व ‘ओबीसी’ प्रवर्गातील प्रमाणपत्र सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारास एका महिन्याची मुदत द्यावी अशीही सूचना अपर महासंचालक कार्यालयाने केलेली होती. परंतु चार उमेदवारांनी हमीपत्र देण्यास असमर्थता दर्शविल्याने आता सर्वांचे लक्ष आयुक्तालयाने मागविलेल्या महासंचालक कार्यालयाकडील पुढील सूचनेकडे लागले आहे.

११८ पदासाठी होती भरती

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील रिक्त शिपाई पदाच्या ११८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मैदानी चाचणी, लेखी चाचणीनंतर १० तारखेला निवड यादी जारी केली होती. कागदपत्रांच्या पडताळणीत ११४ उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी सुरु असतानाच महासंचालक कार्यालयाच्या सूचनांमुळे पुढची प्रक्रिया रखडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

Alia Bhatt : "मी मोबाईलमध्ये पुरावा जपून ठेवलाय" राहामुळे झालं होतं रणबीर-आलियामध्ये भांडण ; लेकीबद्दल बोलताना अभिनेत्री भावूक

Latest Marathi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

Viral: माझा पती दरवर्षी नवीन मुलीसोबत लग्न करतो, ५ वेळा थाटलाय संसार, पहिल्या पत्नीनं फोडलं बिंग

Sachin Pilgaonkar: श्रिया नाही तर 'ही' आहे सचिन-सुप्रिया यांची दत्तक घेतलेली मुलगी; वाचा तिचं पुढे काय झालं?

SCROLL FOR NEXT