Nashik News : महसूल विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्वाधिक १२७ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्या खालोखाल नंदुरबार (११७ कोटी), अहमदनगर (१०७ कोटी) व जळगाव जिल्ह्यात १०३ कोटींची कामे झाली. धुळे जिल्ह्यात केवळ ५६ कोटींची कामे झाली आहेत. (nashik Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme of 127 crore)
दरम्यान, नाशिक जिल्ह्याचा गत सहा वर्षांचा विचार करता २०१८-१९ मध्ये ७५.८३ कोटी, २०१९-२० मध्ये ५९.९३ कोटी, २०२०-२१ मध्ये ७२.२३ कोटी, २०२१-२२ मध्ये ६४.७२ कोटी, २०२२-२३ मध्ये १०१ कोटी व आता २०२३-२४ मध्ये १२७ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये राज्यात गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली.
रोजगार हमी योजनेत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश झाल्याने रोजगार हमीच्या कामांमध्ये वाढ झाली असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात कुशल व अकुशल मिळून चार हजार ४७६ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेत कुशल व अकुशलचे ४०:६० टक्के प्रमाण राखणे अनिवार्य असताना राज्यात ते प्रमाण ३५:६५ असे राखण्यात यश आले. (latest marathi news)
रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक कामांप्रमाणेच वैयक्तिक लाभाची घरकुल, फळबाग लागवड, जनावरांचा गोठा, शोषखड्डे, बांधावरील फळ लागवड, सिंचन विहिर, विहीर फेरभरण, भात खाचरे, गांडूळ खत, तुती लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे आदी कामे करता येतात. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पातळीवर रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात वैयक्तिक लाभाच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे.
ग्रामपंचायत पातळीवर अकुशल व कुशलचे ६०:४० चे प्रमाण राखून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. या सर्व आराखड्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यावर जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते.
राज्यात चार हजार ४७६ कोटींची कामे
राज्यातील ३४ जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेतून कामे केली जातात. या सर्व जिल्ह्यांमध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षात चार हजार ४७६ कोटींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्या आधीच्या म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यात दोन हजार ९८१ कोटी रुपयांची कामे करण्यात आली होती. या योजनेतून वर्षभरात ११ कोटी मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.