Shobha Bachhav and Subhash Bhamare esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : काँग्रेसने उभे केलेले आव्हान; यंदा महायुतीचे गणित चुकविणार

Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना पावणेदोन ते दोन लाख मताधिक्य मिळणार, असा अंदाज ‘सकाळ’ने वर्तविला होता.

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरी मुस्लिम बहुल मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना पावणेदोन ते दोन लाख मताधिक्य मिळणार, असा अंदाज ‘सकाळ’ने वर्तविला होता. काँग्रेसच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात रणरणत्या उन्हाला बाजूला सारून सर्वाधिक विक्रमी ६३.११ टक्के मतदान झाले. (Nashik Lok Sabha Constituency)

तीन लाख दोन हजार ३९१ पैकी एक लाख ९० हजार ८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल पावणेदोन लाख ते एक लाख ८० हजारांच्या मताधिक्क्याने काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, त्यांचा विजय झाल्यास या मतदारसंघाचा त्यात सिंहाचा वाटा असेल. मालेगाव मध्यमधील काँग्रेसची आघाडी महायुतीचे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे कोठे आणि कशी भरून काढणार किंवा नाही, याची जोरदार चर्चा आहे.

मध्यपाठोपाठ धुळे ग्रामीण, शिंदखेडा व मालेगाव बाह्यचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. या तीन मतदारसंघांसह बागलाण व धुळे शहर येथे डॉ. बच्छाव यांनी किमान ४० ते ५० टक्के मते मिळविल्यास त्यांची नौका पार होईल, असा अंदाज आहे. मात्र येथे त्यांना प्रतिसाद न मिळाल्यास विजया दोलक हेलकावू शकतो, अशी आकडेमोड होत असल्याने दोघा उमेदवारांना तूर्त समान संधी वर्तविली जात आहे.

विजयाचे गणित पंधरा ते वीस हजारांच्या आसपासच अवलंबून असेल. सर्वांत अखेरीस उमेदवारी जाहीर होऊनही अवघ्या आठवडाभरात काँग्रेस व मित्रपक्षांनी उभे केलेले आव्हान भाजपला यंदा भारी पडणार, असे चित्र सध्यातरी मांडले जात आहे. मध्यमध्ये गेल्या तीन लोकसभा निवडणुकींचा इतिहास पाहता भाजप उमेदवार पाच हजारी मनसबदार होते. (latest marathi news)

निवडणूक रिंगणात एमआयएम व वंचित आघाडीचा उमेदवार नसल्याने काँग्रेसच्या मताधिक्क्यात सरसरळ ५० हजार मतांची वाढ होणार आहे. या मतदारसंघात भाजपपेक्षा मोदीविरोधी द्वेष आढळून आला. तीन तलाक, सीएए कायदा व भविष्यात समान नागरी कायदा व संविधानाला नख लावणार हा प्रचार वाढल्याने मुस्लिम स्त्री-पुरुष मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले.

मतदानाला जाताना व येताना ‘मोदी को हराना है, पंजे को जिताना है’, असे मतदार उघडपणे बोलत होते. भाजपचे येथे मोजके तीन मतदान केंद्र वगळता कोठेही नामोनिशाण नव्हते. तरीदेखील तीन तलाकचा कायदा केल्याने काही मुस्लिम महिला आपल्या पारड्यात मते टाकतील, अशी भाबडी आशा भाजप बाळगून आहे. येथील विक्रमी मतदान अनेकांना तोंडात बोट घालायला लावणारे आहे.

आठ अपक्ष मुस्लिम उमेदवार व नोटा, अशी अंदाजे पाच हजार मतांची गोळाबेरीज होणार आहे. भाजपचा मतविभाजनाचा डाव फेल जात सरळ लढत झाल्याने अनेकांचे आडाखे चुकणार आहेत. अन्य पाच विधानसभा मतदारसंघांतील दलित व मुस्लिम मतांची जोडही काँग्रेस उमेदवाराला मिळाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वेळच्या तुलनेत येथील मतदानाच्या टक्केवारीत दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

मतदारसंघातील प्रश्‍न, जनसामान्यांच्या समस्या याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव येथे यशस्वी ठरला आहे. भाजपचा मुस्लिमविरोधी प्रचाराचा सूर येथे काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेने काहीसा हातभार लागला असला तरी ॲन्टी इन्कम्बन्सी, महागाई, रोजगारी, कांदा, शेतमालाला हमीभाव हे मुद्देही प्रभावी ठरल्याने या वेळी मालेगाव मध्यमधील एकगठ्ठा मतदानाचा बाऊ करून हिंदू मतदार एकवटले नाहीत.

२०१९ ची मालेगाव मध्यची स्थिती

एकूण झालेले मतदान - एक लाख ४३ हजार ३६८

काँग्रेस (कुणाल पाटील) - एक लाख २६ हजार २७३

भाजप (डॉ. सुभाष भामरे) - पाच हजार ३५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT