Union Minister Nitin Gadkari speaking at the campaign meeting of Mahayuti in Chandwad. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवार यांच्यासाठी नितीन गडकरींची ‘बॅटींग’

सकाळ वृत्तसेवा,

गणूर : मी स्वप्न दाखविणारा नेता नाही, मी जे बोलतो तेच करतो, गेल्या दहा वर्षात जे बोललो, ती कामे पूर्ण केली. बाकी जे स्वप्न दाखवितात परंतु पूर्ण करत नाही अशा नेत्यांची जनता धुलाई करते असा टोला विरोधकांना लगावत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. भारती पवार यांच्यासाठी जोरदार बॅटींग केली. (Nashik Lok Sabha Constituency)

भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास सर्वोच्च प्राधान्य हे कांद्याला असेल, निर्याती संदर्भात ठोस धोरण तयार करून निर्यातक्षम भारत घडविण्याचे, भारताला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपली सेवा करण्याची संधी पुन्हा पक्षाला द्या, असे आवाहनही यावेळी गडकरी यांनी केले.

दिंडोरी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. शेवटच्या टप्प्यातील ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. तत्पूर्वी चांदवड शहरातून रोड शो काढण्यात आला. व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, आमदार डॉ. राहुल आहेर, केदा आहेर.

डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल आदिसह महायुतीचे मान्यवर उपस्थित होते.
गडकरी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडून होणाऱ्या उपाययोजनांची माहिती देत हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कधीही अडचण होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

कृषी क्षेत्राचा विकासदर निगेटिव्ह होता.शेती क्षेत्राची प्रगती मर्यादित होती. मात्र गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे शेती क्षेत्रात अनेक सुधारणा झाल्या आहेत. सध्या शेती क्षेत्राचा विकास दर तीन टक्के झाला आहे. अनेक कायमस्वरूपी योजना राबविल्या जात आहे. कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी साठवणुकीची योग्य व्यवस्था करण्याचे धोरण आहे. (latest marathi news)

कांदा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांवर प्रक्रिया करण्याची गरज आहे. तशी व्यवस्था सरकारने करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्राचा शेती सिंचनाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नार-पार प्रकल्पातून या मतदार संघातील सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली लावण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांसाठी बोलताना कांदा, गहू, मका, या पारंपारिक पिका व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी आता अन्नदाता - उर्जादाता व त्यानंतर इंधन दाता म्हणून पुढे आले पाहिजे यासाठी शेतातील मकापासून इंथेनॉल तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जे यातून आर्थिक उन्नती होईल. याची प्रचीती देण्यासाठी मी मकापासून इथेनॉल बनविण्याचा निर्णय घेतल्यानेच मक्याला आज चांगला भाव मिळत आहे.

अन्यथा बाजारात मका कमी दराने विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली असती. तसेच पुढील काळात शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रीक व सीएनजी वर चालणारा किफाईतशीर ट्रॅक्टरचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी संविधान बदलण्याचे पाप कॉंग्रेसच्या काळात ८० वेळा केले गेले. मात्र आज तेच विरोधक त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने महायुतीवर संविधान बदलण्याचा आरोप करीत आहे.

यावेळी गडकरी यांनी चांदवडचे दिवंगत आमदार जयचंद कासलीवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला. रस्ते आणि महामार्गांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात दिंडोरीसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली आहे या क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. भारती पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले, त्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवार आहेत. त्यामुळे इथली जनता भारती पवार यांच्यासोबत राहिल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT