Yeola farmers getting information about seeds. esakal
नाशिक

Nashik News : निवडणूक संपली, आता शेतकऱ्यांची लूटमार! मका बियांण्यात तब्बल 300, तर कांदा बियाण्यात हजार रुपयांची वाढ

Nashik News : जिल्ह्यात तब्बल ४० टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या मका बियाण्यात यावर्षी फक्त चार किलोच्या प्रती पिशवी २०० ते ३०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे.

संतोष विंचू

येवला : बियाणे कंपन्यांवर सरकारचा अंकुश आहे का, असा संतप्त सवाल करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात तब्बल ४० टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या मका बियाण्यात यावर्षी फक्त चार किलोच्या प्रती पिशवी २०० ते ३०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. याशिवाय कांदा बियाण्यातही १००० ते १५०० तर मूग, तूर, बाजरी या बियाण्यातही ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. ( Maize and onion seed price increase)

यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. निवडणूक संपली म्हणून शेतकऱ्यांची लुटमार सुरू झाली का, असा सवाल शेतकरी करत आहेत. मागील सलग तीन ते चार वर्ष बियाण्यांच्या मोठ्या दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांवर पडला असून, कंपन्यांच्या मनमानीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता.

दुष्काळ व शेतमालाचे कोसळलेले दराचा बसल्याने संकटातील शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन व अर्थकारण विस्कळीत झाले आहे. त्यातच बियाणे व खते दरवाढीचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने शासनाच्या धोरणावर टीका होत आहे.

जिल्ह्याचा पीक पॅटर्न मागील दोन- तीन वर्षात बहुतांशी बदलला असून, खरिपात मकाचा व सोयाबीनचा जिल्हा अशी ओळख तयार होऊ लागली आहे. यावर्षी देखील मकासह सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असून, बेभरवशाचा कांदा देखील आहे तसाच राहील.

मका दरात मोठी वाढ

खरीपात जिल्ह्यात सुमारे ४५ ते ५० टक्के म्हणजेच दोन लाख ४० हजार हेक्टरवर मक्याचे पीक घेतले आहे. मकाला वाढलेल्या मागणीसोबतच दरातील होणाऱ्या वाढीमुळे मका जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाडके पीक बनत असून, याचमुळे बियाण्याची मागणी वाढल्याने कंपन्यांनी बियाणे पिशवीमागे १०० ते ३०० रुपयांची वाढ केली आहे. बाजारात बियाणे पुरवठा भरपूर आहे. मात्र, ठराविक वाणाला मागणी असते. (latest marathi news)

त्यातही हे गणित पावसावर अवलंबून असते. खरिपाच्या तोंडावर बियाणे पिशव्या बाजारात विक्रीला असून, यावर्षी चौदाशे ते दोन हजार रुपये दरम्यान किमती आहेत. बियाणे दराने प्रथमच २ हजाराचा टप्पा पार केला आहे. ॲडव्हान्स, महिको, पायोनियर सिजेंटा, ॲडव्हान्टा या कंपनीच्या वाणाला जिल्ह्यात सर्वाधिक मागणी असते.

कांदा बियाणे महागले

शेतकरी शक्यतो शेतात डोंगळे लावून कांद्याचे बियाणे तयार करतात. यावर्षी शेतकऱ्यांकडे बियाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बाजारातील कंपन्यांच्या कांदा बियाण्यातही यंदा मोठी वाढ झाली आहे. प्रति किलोमागे सुमारे हजार ते पंधराशे रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना धक्काच बसेल. मागीलवर्षी १२०० ते १४०० रुपयांना मिळणारे बियाण्यांचे पाकीट यावर्षी १७०० ते २१५० रुपयांना मिळणार आहे.

कपाशीसह बाजरी, मकात वाढ

कपाशीच्या बीटी २ बियाण्यांचे दरवाढ शासनाच्या मान्यतेने होत असून, सलग तिसऱ्या वर्षी ११ रुपये वाढ झाल्याने एक किलोची पिशवी ८६४ रुपयांना मिळणार आहे. याशिवाय तूर, बाजरी, मूग बियाणे दरातही ५० ते १०० रूपांची वाढ झाली आहे. सर्वच प्रमुख बियाण्यांचे दर गगनाला भीडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी एकूण बियाण्याच्या खरेदी मागे हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

सोयाबीनची घट आश्‍चर्यकारक

सोयाबीन दर २०२१ मध्ये गगनाला भिडले होते. त्यातच खरिपात पैसे देणारे पिक असल्याने जिल्ह्यात सोयाबीन पेरणी क्षेत्रही वाढले अन बियाण्याच्या दरात मागीलवर्षी विक्रमी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र, मागील दोन वर्षी सोयाबीनच्या दराने गटांगळ्या खाल्ल्याने त्याचा परिणाम बियाण्याच्या दरावर झाला असून, मागीलवर्षी दरात ५०० रुपयांनी घट झाली होती.

मागणी व पुरवठ्याचे सूत्र जुळत नसल्याने यावर्षी देखील ५०० ते ७०० रुपये दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल. अर्थात, क्षेत्र कमी होत असल्याने बियाणे मागणीतही घट होत असल्याचे दिसते. मागील वर्षी सोयाबीनची पिशवी ३००० ते ३५०० रुपयांना मिळत होती. यावर्षी हाच दर २२०० ते २७०० रुपयांवर घटला आहे.

"पावसाच्या आगमनावर पेरणीचे चित्र ठरेल. मात्र, जिल्ह्यात सोयाबीन, मक्‍यासह बाजरीच्या क्षेत्रात वाढ होईल, असे चित्र आहे. मागणी, बाजारभाव विचारात घेऊन बियाण्यांचे दर स्थिर राहिले आहे. सोयाबीन दरात ५०० ते ८०० रुपये घट झाली. तर मकाला मागणी वाढत असल्याने ५०० रुपयांतपर्यंत दरवाढ झाली आहे. कांद्यासह बाजरीच्या बियाणे दरातही वाढ झाली." - नितीन काबरा, संचालक, द्वारका एजन्सी, येवला

असे वाढले बियाणे पॉकिटाचे दर

पीक - २०२४ चे दर (कंसात २०२३ चे दर)

मका इलाईट - १६०० - (१५५०)

मका पयोनियर - २०५० (१७५०)

मका ॲडव्हान्टा - १७०० (१४५०)

मका महिको - १५०० (१३५०)

मका बायर - १६०० (१४००)

मका बायोसिड - १४०० (१३००)

सोयाबीन महाबीज - २७०० (३१००)

सोयाबीन ईगल - २५०० (३०००)

सोयाबीन ग्रीन - ३५००(३०००)

सोयाबीन प्राईड - २७०० (३०००)

सोयाबीन फुलसंगम - २४०० (२८००)

कपाशी - ८६४ (८५३)

(महिको, अजित, महिको, निजीवुडू व सर्व)

कांदा बियाणे - १७०० ते २१५० (१४००)

(एलोरा, पंचगंगा, चव्हाण, ईस्टवेस्ट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT