येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव कोरडा होऊ लागल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट घोंगावू लागले आहे. याशिवाय तालुक्यात ग्रामीण भागात सुमारे ११६ टँकर रोज या पाण्यावर अवलंबून असल्याने दाहकता अधिकच वाढली आहे. या संकटात पालखेड डाव्या कालव्याचे मुदतीत म्हणजेच शनिवारी (ता. १)पासून आवर्तन सोडण्यात येणार असल्याने मनमाडसह येवल्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. (major crisis of water scarcity as lake that supplies water to city of Yeola is drying up)
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन योजनेच्या सुमारे ९० एकरांच्या तलावात घेतलेले पाणी शहराची तहान भागवते. साधारणतः दोन महिन्यांतून हा तलाव भरून घेतला जातो. इतर दिवसांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा शहराला होतो. मात्र या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भरउन्हाळ्यात पाच दिवसांत म्हणजेच आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. विहिरींवर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारी सुमारे ११६ पाण्याचे टँकर रोज भरले जातात.
आशात तलाव आटल्याने शहराला ५ जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, तलावाने तळ गाठल्याने मातीमिश्रित पाणीपुरवठा सुरू आहे. तलाव कोरडा पडल्यावर विहिरी आटू लागतात. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा देखील गंभीर प्रश्न उभा राहिला असता, या पार्श्वभूमीवर नगर पालिकेकडून पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाने टंचाईची संभाव्यता लक्षात घेऊन अखेर पिण्याच्या पाण्यासाठीचे शेवटचे असलेले आवर्तन शनिवारपासून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आ पालखेड डावा कालव्याद्वारे मनमाड नगर परिषद, येवला नगर परिषद, येवला तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड व ग्रामपंचायत आंबेगाव या शासनमान्य पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. (latest marathi news)
सदर आवर्तनाद्वारे देण्यात येणारे पाणी फक्त शासनमान्य बिगरसिंचन संस्था यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असून, या पाण्याचा शेतीसाठी किंवा इतर कारणांसाठी उपसा करू नये, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी केले आहे.
सदर आवर्तन कालावधीत कालव्यालगतचा वीजपुरवठा खंडित करणे, पोलिस बंदोबस्त पुरविणे याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहे. अनधिकृत पाणीउपसा करण्यांवर पाटबंधारे अधिनियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
"शहराच्या आणि योजनेच्या साठवण तलावात ५ जूनपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. नियोजन केल्याने हे पाणी शहराला साठ दिवस पुरले असून, आत्ता सोडलेल्या आवर्तनातून तलाव भरून घेतला जाणार आहे. हे पाणी देखील पाऊस पडून आवर्तन मिळेपर्यंत पुरवावे लागेल." - रूपाली भालेराव, पाणीपुरवठा विभागप्रमुख, नगर पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.