A couple came to Chetak's showroom on Agra Road to buy an e-bike esakal
नाशिक

Electric Vehicle : कसमादेत ई.-बाईकचा बोलबाला; कोविडनंतर 4 वर्षांत साडेतीन हजार इलेक्ट्रीक वाहनांची दमदार विक्री

जलील शेख

मालेगाव : प्रदूषणमुक्त वातावरणाला फायदेशीर असलेल्या ई.- बाईककडे नागरिकांचा कल वाढत असून पेट्रोल वाहनापेक्षा परवडत असल्याने अनेकांचा ई.- बाईक घेण्याकडे ओढा वाढला आहे. दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांमध्ये बाईकला सर्वाधिक प्राधान्य मिळत असून शहरासह कसमादेत कोविडनंतर गेल्या चार वर्षांत चारचाकी, दुचाकी, तीनचाकी रिक्षा अशा एकूण ३ हजार ४४० ई. वाहनांची विक्री झाली आहे. (Electric Vehicle)

केंद्र सरकारने २००५ मध्ये इलेक्ट्रीक वाहनांची व्याख्या निश्चित केली होती. त्यानंतरही ई.- बाईकला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा १८ ऑक्टोबर २०१८ ला जनरल परवान्यामध्ये सूट देण्यात आली होती. तरीही ई. बाईक घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत नसल्याने शासनाने २१ ऑगस्ट २०२१ ला नोंदणीसाठी सवलत दिली होती.

ई.- बाईकचा वापर व्हावा व प्रदूषण कमी व्हावे यासाठी १८ एप्रिल २०२३ ला ऑल इंडिया टुरिस्ट परमिटमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र ई.- वाहनांनी टॉप गिअर टाकला आहे. नागरिकांना विविध सवलती मिळत असल्याने अनेकजण ई.- बाईक घेताना दिसत आहेत. ई.-हाईक चार्जिंगसाठी खूपच कमी युनिट लागतात. त्यामुळे पेट्रोलची मोठ्या प्रमाणात बचत होते. दोन वर्षातच ई.- वाहन घेतलेल्या नागरिकांचे पैसे वसूल होतात.

त्यामुळे अनेक नागरिक इलेक्ट्रीक दुचाकी घेत आहेत. दुचाकीबरोबरच वाहतुकीसाठी रिक्षा यासह अनेक विविध प्रकारची वाहने बाजारात उपलब्ध होत आहेत. ई.-बाईकसाठी नवीन शोरूम उघडल्याने अनेकांना मोठ्या प्रमाणात व्यवसाय व रोजगार मिळाला आहे. या वाहनांमध्ये शासनाकडून सवलत देखील दिली जात असल्याने अनेकजण ई.- बाईक घेताना दिसत आहेत. कमी खर्चात व प्रदूषणमुक्त असल्याने शहरासह कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, नांदगाव यासह ग्रामीण भागात देखील ई.- बाईकला पसंती दिली जात आहे. (latest marathi news)

खराब बॅटरी अधिकृत सेंटरला द्यावी

प्रदूषण रोखण्यासाठी ई. बाईकमध्ये बॅटरीचा वापर केला जातो. ई. बाईक वापरल्यानंतर कालांतराने बॅटरी खराब होते. त्यामुळे बॅटरी विकताना किंवा अदलाबदल करताना अधिकृत केंद्राला द्यावी. कारण या बॅटरीत लीड राहतो. फेरीवाला किंवा भंगार विक्रेत्याला ही बॅटरी दिल्याने ते बॅटरी मोकळ्या जागेवर फोडतात. त्यामुळे त्या बॅटरीमधील लीड हे जमिनीत पडते. पाणी पडल्याने लीड जमिनीत उतरल्याने पाण्यात मिसळल्यास ते शरीराला घातक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अशी झाली वाहनाची विक्री.

१) दुचाकी, मोपेड, स्कूटी ः ३३७७

२) चारचाकी - कार ः ५६

३) ऑटो रिक्षा ः

"चेतक ई.- बाईक २०१९ पासून बाजारात आली आहे. एक लाखांपासून ते दीड लाखापर्यंत वाहने उपलब्ध असल्याने अनेक नागरिक घेत आहेत. दुचाकीची बॉडी मेटल असल्याने अनेकांचा कल चेतक ई.- बाईककडे आहे. दोन युनिटमध्ये पूर्ण बाईक चार्जिंग होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर सुमारे शंभर किलोमीटरपर्यंत हे वाहन चालते." - दीपक महाजन, व्यवस्थापक, चेतक शो-रुम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT