Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : मालेगावमध्ये अंधशाळा दाखवून शासनाचे लाटले अनुदान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव येथील अंध शिक्षण व प्रशिक्षण संस्था नावाने रावळगाव नाका परिसरात कागदोपत्री अंध वसतिगृह दाखवून अनेक वर्षांपासून होत असलेली शासनाची फसवणूक सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी उघडकीस आणली आहे. (Malegaon blind education and training institute defrauded government by pretending to be hostel for blind)

संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी संगनमताने केवळ सात विद्यार्थी असताना ५० विद्यार्थी असल्याचे भासवून त्यात २४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दाखवून त्यांचे वेतन व वसतिगृह अनुदान शासनाकडून लादले असल्याचे समोर आले. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

मालेगाव अंध शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शासनाची अनुदानित अंध शाळा (वसतिगृह) चालते व त्यात केवळ सात अंध विद्यार्थी असताना कागदोपत्री ५० विद्यार्थी दाखवून शासनाकडून अनुदान अन्य लाभ घेत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने द्यानद्यान यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली.

सदर माहिती ही चुकीची दिशाभूल करणारी असल्याचे दिसून आल्यावर त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांना सदर प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले. (latest marathi news)

त्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या चौकशी समितीने एप्रिलमध्ये चौकशी करून अहवाल सादर केला. सदर अहवालात अंधशाळेत केवळ सात विद्यार्थी असताना ५० विद्यार्थी दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक करीत त्यावर वसतिगृह अनुदान आणि २४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते व इतर अनुषंगिक लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकारामुळे शासनाची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्यामुळे दिव्यांग शाळेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त (पुणे) यांच्याकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू- सुप्रिया सुळे

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT