Malegaon Satish Ahire selling tomatoes at the Mahatma Phule vegetable market here. esakal
नाशिक

Bakari Eid 2024 : टोमॅटो, मिरची विक्रीत बकरी ईदमुळे दुपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : बकरी ईदमुळे येथील भाजीपाला बाजारात टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, अद्रक, पुदिना, लसूण यांची आवक काही प्रमाणात वाढली होती. घाऊक बाजारात सर्वात जास्त लवंगी मिरची आवक होती. रविवारी (ता.१६) पासून ते बकरी ईदपर्यंत बाजारात रोज वीस टन लवंगी मिरची विकली गेली. शहरात टोमॅटो, अद्रक, लवंगी मिरची, पुदिना, लसूण यांना बारमाही मागणी असते. (malegaon Double increase in sales of tomatoes chillies due to Bakri eid)

येथे अनेक चौकांत रोज पुलाव विक्रीची शेकडो दुकाने आहेत. टोमॅटो व लवंगी मिरचीचा येथे अंडा भुर्जीत मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच दर शुक्रवारी पूर्व भागात अनेक घरात पुलाव तयार होत असल्याने येथे मिरची व टोमॅटो, पुदिना यांच्या विक्रीत दुपटीने वाढ होते. येथे गेल्या दहा दिवसांपासून टोमॅटोचे चारशे ते पाचशे कॅरेट विक्रीसाठी येत आहेत.

टोमॅटोला येथे सातशे ते हजारपर्यंत भाव मिळाला. किरकोळ बाजारात टोमॅटो ऐंशी रुपये किलोप्रमाणे विक्री झाले. येथे सोमवार बाजार, इकबाल डाबी, आझाद नगर, गोल्डन नगर, साठफुटी, मेहवी नगर, आयेशा नगर, मच्छी बाजार, रमजानपुरा, महात्मा फुले भाजीपाला मार्केट या सर्व ठिकाणी बाजार भरतात.

दैनंदिन भरणाऱ्या बाजारात भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे. येथे लवंगी मिरच्या वापर टिकिया, समोसा यासह अनेक खाद्यपदार्थ वापर होतो. लवंगी मिरची खाण्यासाठी झणझणीत असल्याने तिची चव वेगळी असते. त्यामुळे मालेगावकर मिरचीला पसंती देतात. (latest marathi news)

येथे लवंगी मिरची मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश येथील बरेली तर छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातून तर कळवण तालुक्यातील अभोणा येथून येत असल्याचे येथील व्यापारी सांगतात. येथे अद्रकची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. सात ते आठ टन रोज अद्रक विक्री होत होती.

किरकोळ दर असे.

टोमॅटो - ४० ते ८० रुपये किलो.

अद्रक - १६०

लसूण - २४०

लवंगी मिरची - ८०

पुदिना - १५ जुडी

कोथिंबीर - २००

"सध्या अनेक शेतकऱ्यांकडे पाणी नसल्याने भाजीपाला पीकही कमी आहे त्यामुळे बाजारात भाजीपाल्याला काही प्रमाणात मागणी असून भाव तेजीत आहे बकरी ईद मुळे लवंगी मिरची अद्रक व टोमॅटो यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली." - महेंद्र (बाबा) वाघ लवंगी मिरचीचे घाऊक व्यापारी, मालेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT