appointment esakal
नाशिक

Nashik News : नाशिक, मालेगावला स्वतंत्र अपर तहसील कार्यालय! महसूल मंडळांचे विभाजन, 4 कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती

Latest Nashik News : दोन्ही ठिकाणच्या कार्यालयात अपर तहसीलदारांसह नायब तहसीलदार, अव्वल कारकून लिपिक अशा चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याने प्रशासकीय कामकाज सुलभ होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी नाशिक व मालेगावला स्वतंत्र अपर तहसील कार्यालय निर्माण करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तहसीलदार व अपर तहसीलदार यांना महसूल मंडळे विभागून दिली आहेत. दोन्ही ठिकाणच्या कार्यालयात अपर तहसीलदारांसह नायब तहसीलदार, अव्वल कारकून लिपिक अशा चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याने प्रशासकीय कामकाज सुलभ होणार आहे. (Nashik Malegaon independent upper tehsil office)

नाशिक व मालेगाव तालुक्याची लोकसंख्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे. २०११ च्या तुलनेत सरासरीने दुप्पट आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या अनुषंगाने होणाऱ्या नोंदी, दावे, विविध प्रकारच्या परवानग्या विषयक कामकाजात सदर तालुक्यात प्रचंड वाढ झाली आहे.

नाशिक शहर व तालुक्याचा स्वतंत्र कारभार असावा यासाठी तत्कालीन नाशिक तहसीलदार डॉ.राजश्री अहिरराव यांनी प्रस्ताव तयार केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाकडे तो पाठवण्यात आला. राज्य शासनाने सात वर्षानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला. यात अपर तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून आणि महसूल सहायक (लिपिक-टंकलेखक) अशी चार पदे मंजूर केली आहेत. (latest marathi news)

नाशिक तहसीलदार: एकूण मंडळे - ५

(माडसांगवी,शिंदे,गिरणारे,भगूर,महिरावणी) , महसूल गावे -७५

अपर तहसीलदार नाशिक : एकूण मंडळे-५

(नाशिक,सातपूर,देवळाली,मखमलाबाद,पाथर्डी) महसुली गावे -३३

मालेगाव तहसीलदार : एकूण मंडळे -एकूण मंडळे -१२ (दाभाडी, अंजग, सौंदाणे, कोळाणे नि,जळगाव नि.,निमगाव,कळवाडी, झोडगे,करंजगव्हाण, डोंगराळे,वडनेर,सोयने खु.) महसूली गावे १४१

अपर तहसीलदार मालेगाव : एकूण मंडळे -३ (मालेगाव,करंजगव्हाण,सायने) महसुली गावे १०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT