A businessman selling dry fruits on Mohammad Ali Road in Malegaon.  esakal
नाशिक

Ramadan Festival : शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी बाजारपेठ सज्ज! चारोळीचे दर गगनाला

Nashik News : रमजानचे रोजे (उपवास) अंतिम टप्प्यात आल्याने सर्वांनाच ईदचे वेध लागले आहेत.

जलील शेख

मालेगाव : रमजानचे रोजे (उपवास) अंतिम टप्प्यात आल्याने सर्वांनाच ईदचे वेध लागले आहेत. दिवसागणिक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. ईदच्या शिरखुर्म्याचे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. शिरखुर्म्यासाठी लागणारे काजू, बदाम, चारमगज, मणुका, खोबरे, चारोळी, खसखस, खजूर यांची बाजारात रेलचेल आहे. शेकडो दुकानांवर ग्राहकांची गर्दी होत आहे. चारोळीचे दर किलोला ३ हजारावर गेले आहेत. तर खोबरे गेल्या वर्षाच्या तुलनेने ५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. (nashik malegaon Ramadan Festival market ready for sheerkhurma materials news)

ईदच्या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांनी महिनाभरापुर्वीच मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुटचा माल भरुन ठेवला. महागाई असली तरी सणासाठी शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करण्यास गरीब-श्रीमंतांपासून सर्वच घटकांची लगबग सुरु झाली आहे. ईदच्या दिवशी शिरखुर्मा तयार केला जातो.

शिरखुर्मा तयार करताना यात काजू, बदाम, चारमगज, मणुका, खोबरे, चारोळी, खसखस, शेवई, खजूर आदींचा वापर केला जातो. येथे ५० ग्रॅम मिक्स ड्रायफूटसाठी ८० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. शहरात ठिकठिकाणी ड्रायफ्रुट विक्रीची दुकाने लागली आहेत. येथील मोहम्मद अली रोडवर सर्वाधिक दुकाने आहेत. याशिवाय प्रत्येक किराणा दुकानात शिरखुर्माचे साहित्य विक्रीस आहेत.

बदाम, चारोळी हे मुंबई येथून येते. काजू गोवा येथून तर खोबरे केरळ, चारमगज सुडाण, मणुका सांगली येथून तर खजूर इराण येथून येत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. चारोळी तीन हजार रुपये किलोने विक्री होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ड्रायफ्रुटच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही. उलट खोबऱ्याच्या दरात ५० ते ६० रुपये कमी झाले आहे.  (latest marathi news)

दिवाळी-ईदला वाढतो भाईचारा

संवेदनशील असलेल्या मालेगावात हिंदू-मुस्लिम भाईचारा प्रामुख्याने जोपासला जातो. दिपोत्सवात हिंदू बांधव शहरातील मुस्लिम बांधवांना फराळासाठी बोलवितात. तर ईदला मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना शिरखुर्मासाठी बोलवित असतात. यामुळे येथील दोन्ही समाजात भाईचारा जोपासला जात आहे. दोन्ही समाज दिवाळी-ईदला एकमेकांना शुभेच्छा देतात. पोलिस व प्रशासनाकडूनही सणासुदीला राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी उपक्रम राबविले जातात.

असे आहेत ड्रायफ्रुटचे दर (प्रतीकिलो)

काजू, बदाम, चारमगज - प्रत्येकी ८०० रुपये

मणुका - ३२० रुपये

खोबरे - १२०

खजूर - २८०

चारोळी - ३०००

"शिरखुर्मा प्रत्येकाच्या घरी होतो. त्यामुळे ईदला मोठी मागणी असते. विक्रीतही दुप्पटीने वाढ होते. यात चारोळीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तर खोबऱ्याचे दर कमी झाले आहेत."

- सादीक तांबोळी, आजवा ड्रायफ्रुट सेंटर, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT