A crowd gathers to buy women's fancy slippers on Kidwai Street. esakal
नाशिक

Ramadan Eid : मालेगावी रमजान ईदच्या खरेदीची धूम! किदवाई रस्त्यावर गर्दी

Ramzan Eid : रमजानपर्व सुरु होऊन १२ दिवस उलटले आहेत. शहरात कपडे, चप्पल, बुट यासह रमजान ईदसाठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे.

जलील शेख

Ramadan Eid : रमजानपर्व सुरु होऊन १२ दिवस उलटले आहेत. शहरात कपडे, चप्पल, बुट यासह रमजान ईदसाठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कपडे, चप्पल व इतर वस्तूचा दरात मोठी दरवाढ झाली आहे. सध्या कापड बाजार तेजीत आहे. रमजान पर्वाच्या अखेरच्या टप्प्यात तयार कपडे खरेदीवर भर असेल. येथील किदवाई रस्त्यावर शेकडो दुकाने लावण्यात आली आहेत. (nashik Malegaon Ramzan Eid shopping rush on Kidwai street marathi news)

मध्यम वर्गीय व गरीब नागरीकांचा स्वस्त दरात मिळणारे कपडे व वस्तू खरेदीकडे कल असतो. येथे शंभर रुपयांपासून शर्ट व पॅन्ट विकले जात आहेत. शहराबरोबरच ग्रामीण व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मालेगाव हे खरेदीचे हब बनले आहे. किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, गांधी मार्केट, अंजुमन चौक, सरदार मार्केट या भागांमध्ये कपडे, चप्पल, बुट व सौंदर्य प्रसाधने विक्रीची मोठ्या प्रमाणात दुकाने लागली आहेत.

चप्पल, बुट दिल्ली, आग्रा, कानपूर, जयपूर, जोधपूर, कोलकाता, उल्हासनगर, मुंबई येथून तर लहान मुलांचे रेडीमेड कपडे, कोलकाता व मुंबईहून येत आहेत. महिलांसाठी कच्चे ड्रेस हे गुजरात व मुंबई येथून मोठ्या प्रमाणात आणले जात आहेत. लहान मुला व मुलींमध्ये वेस्टर्न ड्रेस, घागरा, प्लाजो, जीन्स पॅन्ड, शर्ट, टी-शर्ट, जॉकेट, सुट, कुर्ता पायजमा, थ्री पीस या कपड्यांना मोठी मागणी आहे.

फॅन्सी ड्रेसला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. चप्पलमध्ये विविध प्रकारच्या फॅन्सी चपला आल्याने महिलांना भुरळ घातली आहे. फॅन्सी चप्पल वापरायला मजबूत नसली तरी महिलांना त्या आकर्षित करीत आहेत.(latest marathi news)

पूर्व भागात पाहुण्यांची रेलचेल

मालेगाव हे यंत्रमागाचे मॅचेस्टर आहे. यंत्रमागापाठोपाठ कुटुंबातील सर्वांसाठी गांधी मार्केट हब ठरत आहे. महिलांना एसटी बसेसमध्ये ५० टक्के सुट असल्याने मोठ्या प्रमाणात महिला भगिनी मालेगावी नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला येत आहेत. दिवसा कडक ऊन व रोजा असल्याने बहुसंख्य महिला रात्री खरेदी करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे येथील बाजारात मोठ्या प्रमाणात रात्री गर्दी उसळत आहे.

रिक्षाचालकांना अच्छे दिन

मालेगावात कमी किंमतीत चांगले कपडे मिळतात. त्यामुळे येथील कपडे खरेदीकडे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचा कल असतो. महिलांना बसच्या तिकीटात सवलत असल्याने बहुसंख्य महिला खरेदीसाठी बाहेरगावाहून येथे येत आहेत. परिणामी, येथील गांधी मार्केट व इतर बाजारात खरेदीला गर्दी होत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांमुळे येथील नवीन व जुने बस स्थानक येथील रिक्षाचालकांचा व्यवसाय तेजीत आला आहे.

टेलर दुकाने हाऊसफुल

इस्लाम धर्मामध्ये मोहरम व रमजान ईदच्या महिन्यात विवाह सोहळा होत नाही. ११ एप्रिलला रमजान ईद झाल्यानंतर लग्नसराईची धूम असणार आहे. ज्या नागरिकांच्या घरी लग्न सोहळा असणार आहे ते आता रमजानच्या कपड्यांमध्ये लग्नाची खरेदी करत आहेत. रमजान संपल्यानंतर आठवडाभर येथे टेलर व इतर वस्तूंची दुकाने बंद असणार आहे. त्यामुळे बहुसंख्य नागरीक आताच खरेदी करुन ठेवत आहेत.

शबे बारातपासूनच येथे कपडे खरेदी करण्यासाठी लगबग सुरु होती. पुरुषांमध्ये तीनशे ते एक हजार रुपयापर्यंत ड्रेसचे कापड मिळत आहे. येथे पुरुषांच्या ड्रेसची शिलाई पाचशे रुपयांपासून तर महिलांची दोनशे रुपयांपर्यंत शिलाई घेतली जात आहे. टेलर व्यवसाय रात्रंदिवस सुरु आहे. अनेक टेलरच्या दुकानांवर आतापासूनच हाऊसफुलचे फलक लावले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT