Guardian Minister Dada Bhuse speaking at the ground-breaking ceremony of 800 crore development works in the city. esakal
नाशिक

Nashik News : मालेगावचा विकासकामांमुळे होणार कायापालट : पालकमंत्री भुसे

Dada Bhuse : विकासकामांमुळे शहराचा कायापालट होतानाच आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील महत्वाकांक्षी भुयारी गटार, पाणीपुरवठा योजनेसह कॅम्प - संगमेश्‍वर प्रभाग कार्यालयातील प्रशासकीय इमारत, मुलभूत सोयीसुविधा, सुवर्णजयंती नगरोत्थान, अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेसह जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ३ कोटीच्या १५ सीसीटीव्ही कॅमरे बसविणे व ८०० कोटींच्या विविध विकासकामांचा भुमिपूजन समारंभ पार पडला.

विकासकामांमुळे शहराचा कायापालट होतानाच आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Nashik Malegaon development works Guardian Minister Bhuse marathi news)

येथील विविध विकासकामांच्या भुमिपूजन समारंभानंतर सटाणा रस्त्यावरील यशश्री कम्पाऊंडच्या आवारात झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम अध्यक्षस्थानी होते. श्री. भुसे म्हणाले, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विकासासाठी १०० कोटी रुपयांचे पॅकेज दिल्यानंतर सर्व प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, तीन नवीन पूल पुर्णत्वास येत आहेत.

५०० कोटी रुपयांची भुयार गटार योजना व १५० कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानायला हवेत. भुयारी गटार योजनेमुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. प्रभाग एकची सुसज्ज इमारत होत आहे.

आयुक्त रवींद्र जाधव यांनी एवढ्या मोठ्या संख्येने विकासकामांचा शुभारंभ फक्त मेट्रो सिटीत होतो. श्री. भुसे यांच्या प्रयत्नामुळे मालेगाव शहरातही हे शक्य झाले आहे. दोन हजार कोटीहून अधिक खर्चाची कामे मिळाली. श्री. निकम म्हणाले, की गेल्या पाच वर्षात पाच कृषी महाविद्यालय, औद्योगिक वसाहत, वीज उपकेंद्र, रुग्णालये, रस्ते, भुयारी गटार, पाणीपुरवठा असा विकासाचा गाडा जोमाने सुरु आहे. ही विकासकामे लक्षणीय आहेत.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले, माजी उपमहापौर निलेश आहेर, संजय दुसाने, मनोहर बच्छाव, नितीन फोफळे, भारत चव्हाण, जगदीश गोऱ्हे, नंदूतात्या सोयगावकर, सुनील देवरे, ओमप्रकाश गगराणी, केवळ हिरे, विनोद वाघ, डॉ. जतीन कापडणीस, निलेश काकडे, लेखाधिकारी राजू खैरनार, शहर अभियंता कैलास बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश शिंदे, उपकार्यकारी अभियंता अली इनामदार आदी व्यासपीठावर होते. सोहळ्यास पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (latest marathi news)

या विकासकामांचे झाले भुमिपूजन

* भुयारी गटार योजना टप्पा २- (रक्कम ४९९ कोटी)

* पाणीपुरवठा योजना- (१४६ कोटी)

* शहरातील विविध रस्ते- (८४ कोटी)

* आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीसुधार योजना- (१८ कोटी)

* नागरी दलीत्तेतर वस्ती सुधार योजना- (८.७० कोटी)

* मुलभूत सोयीसुविधा (नगरविकास विभाग)-(३५ कोटी)

* मोसमपुल-प्रभाग कार्यालय इमारत - (३ कोटी)

* म्हाळदे व रमजानपुरा शादी हॉल - (३ कोटी)

* शहरातील प्रमुख ३० चौकात-११५ सीसीटीव्ही - (३ कोटी)

* भायगाव जिमखाना - (१ कोटी)

रुग्णालयांमध्ये मिळणार सुविधा

येथील वाडिया, अली अकबर व द्याने येथील रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर आहे. १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालयाचे काम अंतिम टप्यात आहे. कॅम्प भागात मॉड्युलर रुग्णालय झाले आहे. सामान्य रूग्णालयाचे श्रेणीवर्धनासह ७६ कोटीच्या कामास मंजुरी मिळाली आहे. याशिवाय विविध योजनेंतर्गत सुमारे दीडशे कोटी रुपयांची विकासकामे होत असल्याने शहराचा कायापालट होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचा ३५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT