Mandvad gram sevak suspended esakal
नाशिक

Nashik News : अनुदान अपहार प्रकरणी मांडवड ग्रामसेवक निलंबित! जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाईचा दणका

Nashik News : तीन लाख ५७ हजार ७५० रुपयांच्या अपहार प्रकरणी मांडवड (ता. नांदगाव) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून तीन लाख ५७ हजार ७५० रुपयांच्या अपहार प्रकरणी मांडवड (ता. नांदगाव) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे. (Mandvad gram sevak suspended)

नांदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल मित्तल यांना सादर करत कारवाईची शिफारस केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यामध्ये नोव्हेंबर २०२३ या महिन्यात झालेल्या गारपिटीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबाबत राज्य शासनाने त्यांना ठराविक अनुदान मदत म्हणून दिले होते.

नांदगाव तालुक्यातील मांडवड गावचा ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात अनेक शेतकऱ्यांचा निधी सातत्याने स्वतःच्या बँक खात्यातच वर्ग करत होता. नातेवाइकांची नावे दाखवत या निधीची रक्कम वर्ग करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नांदगाव गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तहसीलदारांना पत्रव्यवहार केला. (latest marathi news)

त्या अनुषंगाने मंडळ अधिकाऱ्यांनी त्याविरोधात नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकारामुळे १२ शेतकऱ्यांनी नांदगाव पंचायत समितीसमोर उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांनी चौकशी करत अहवाल सादर केला होता. त्यानुसार सर्व बाबी तपासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मांडवड ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

"सदर प्रकरणामध्ये संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढे त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यामध्ये आलेल्या मुद्द्यांना अनुसरून त्याच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाईल." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT