Manoj Jarange Patil : मनोज जरांगे शांतता रॅलीच्या समारोपासाठी नाशिकमध्ये दाखल होताच, जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नाशिक हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, नाशिकवर भुजबळांचे नाव लिहिलंय का, भुजबळ अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे सांगत जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस आणि मंत्री भुजबळ यांच्यावर कडाडून टीका केली. (Manoj Jarange criticizes on Bhujbal )
निवडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार असून, आगामी विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार असून, पुढचे सरकार आमचेच असेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. ओबीसी नेते तथा मंत्री भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात नाशिकमध्ये मंगळवारी (ता. १३) जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप झाला. त्या पार्श्वभूमीवर तपोवन येथे दाखल झाल्यानंतर जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (latest marathi news)
नाशिकमधील मराठा समाजाने कॉलर टाइट केली आहे, असे सांगत उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही कॉलरला हात लावून दाखवला. नाशिक जिल्हा हा मराठा समाजाचा बालेकिल्ला असून, नाशिकवर भुजबळांचे नाव लिहिले आहे का, असा सवाल करत जरांगे यांनी भुजबळ अन् फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या असल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी पुढील सरकार आमचेच येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरवात झाली. तपोवन जुना आडगाव नाका-निमाणी मालेगाव स्टँडमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठायोद्धा मनोज जरांगे- पाटील यांचे स्वागत झाले. दुसरीकडे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.