Passengers trying to board the bogie when there is no space in the carriage esakal
नाशिक

Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

Nashik News : पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पंचवटीसह अनेक गाड्या सोमवारी (ता. ८) सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पंचवटीसह अनेक गाड्या सोमवारी (ता. ८) सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पावसाचे वातावरण कायम असल्याने रेल्वे वाहतूक दोन दिवस तरी अनिश्चित आहे. पंचवटी, धुळे-मुंबई नागपूर सेवाग्राम, जनशताब्दी या प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या. (Many Railway trains including Panchavati canceled for second day)

मनमाडहून मुंबईला निघालेली पंचवटी नाशिकला पोचल्यावर रद्द करण्यात आली. धुळे-मुंबई गाडी इगतपुरीपर्यंत धावली. जनशताब्दी-हिंगोली नाशिक रोड स्थानकातून माघारीला रद्द केली. सेवाग्राम देवळाली कॅम्प येथून धीम्या गतीने मुंबईला रवाना करण्यात आली. पंचवटी सलग दुसऱ्या दिवशी रद्द झाल्याने मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त नियमित प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले.

पंचवटीचे काही प्रवासी नाशिक रोडहूनच घरी परतले. ज्यांना जाणे गरजेचे होते, त्यांनी खासगी गाडी व बसने मुंबई गाठली. रविवारी वाशिंदजवळ रुळाखालील भराव वाहून गेल्याने अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या. दोन दिवसापूर्वी पंचवटीचे कपलिंग तुटल्याने ही गाडी विलंबाने मुंबईला पोचली होती. सोमवारी पावसामुळे गाडी रद्द झाली. पंचवटीच्या प्रवाशांनी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र गाडी द्यावी अशी मागणी केली आहे.

वाशिंदजवळ रेल्वे रुळाखालील जमीन पावसामुळे खचल्याने अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या. देवळाली कॅम्प येथे रद्द झालेल्या गाड्यांतील प्रवाशांना वीस बसद्वारे मुंबई येथे नेण्यात आले. पंचवटी मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब केदारे गेली ३९ वर्ष नाशिक-मुंबई-नाशिक असा प्रवास करत आहे. (latest marathi news)

रेल्वेने प्रथमच अशी मदत केल्याचे सांगून त्यांनी प्रवाशांच्या वतीने मध्य रेल्वे, भुसावळ विभाग तसेच देवळालीचे स्टेशन मास्तर आरे. के. कुठार यांचे आभार मानले. पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, रेल्वे किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, दीपक कोपरगावकर, उज्ज्वला कोल्हे, संतोष केदारे यांनीदेखील रेल्वेचे आभार मानले.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

(11007) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्स्प्रेस

(12127) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस

(11009) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे सिंहगड एक्स्प्रेस

(12123) छत्रपती शिवाजी महाराज - पुणे डेक्कन क्वीन

(12109) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

(11008) पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस

(12128) पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस

(11010) पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस

(12124) पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस ट्रेन इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली.

(इगतपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशत: रद्द)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT