Maratha mahasangh  esakal
नाशिक

Nashik News : नाशिकमध्ये मराठा महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन; 10, 11 ऑगस्टला आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करणे आणि समाजघटकांचे उद्योग, सहकार, क्रीडा, शिक्षण, कृषी क्षेत्रात प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरिता अखिल भारतीय मराठा महासंघाचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. शहरातील लंडन पॅलेस या हॉटेलमध्ये १० व ११ ऑगस्टला हे अधिवेशन होईल. (Maratha mahasangh organized National convention on 10 and 11 August )

यात मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा करून आवश्‍यक ठराव मंजूर केले जातील, अशी माहिती मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये हे अधिवेशन होत असल्याने राज्यातील नेत्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे. अधिवेशनाची माहिती देताना श्री. कोंढरे म्हणाले, की राज्यातील सर्वांत प्रगत जिल्ह्यांमध्ये नाशिक चौथ्या क्रमांकावर आहे.

कृषी, पर्यटन, सहकार, क्रीडा, कला या क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचे मार्गदर्शन मराठा समाजातील युवकांना मिळेल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सातला विविध क्षेत्रांतील २०० नामवंत व्यक्तींची गोलमेज परिषद होणार आहे. ‘नाशिक आजचे, उद्याचे आणि मराठा समाज’ हा या परिषदेचा विषय राहील. मुख्य परिषद ही रविवारी (ता. ११) राहणार असून, यात समाजातील नामवंत व्यक्ती विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. (latest marathi news)

नाशिकमधील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, उद्योजक शशिकांत जाधव, अर्थतज्ज्ञ गिरीश चकोरिया आदी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा येत्या काही दिवसांत ठरवली जाईल. विशेषत: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. तसेच ‘शिक्षण, महिला व युवकांचे भवितव्य’ या विषयावरही विचारमंथन होईल. परिषदेने मंजूर केलेले ठराव राज्य शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.

या वेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, कोशाध्यक्ष प्रमोद जाधव, युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, राजेंद्र शेळके, अशोक कदम, नानासाहेब बच्छाव, स्वाती जाधव, शोभा सोनवणे, ॲड. स्वप्नाली राऊत, संजय पडोळ, दीपक पाटील, राजेंद्र जाधव, राम निकम, रोहिणी उखाणे, सुवर्णा पाटील, अनिता डेमसे, शैलजा चव्हाण, रूपाली सोनवणे, वंदना कदम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT