Election News esakal
नाशिक

Nashik Market Committee Election: उमेदवारांना चिन्ह वाटप करून यादी प्रसिद्ध! 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १५ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात असून, यामध्ये दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.

माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या ‘आपलं पॅनल’ व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’ पॅनलमध्ये ही लढत रंगणार आहे. शुक्रवारी (ता. २१) उमेदवारांना चिन्हवाटप करून अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली.

यात पिंगळे गटाला कपबशी, तर चुंभळे गटाला विमान हे चिन्ह मिळाले आहे. (Nashik Market Committee Election Allotment of symbols to candidates and release of list 37 candidates in fray for 15 seats news)

सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटाच्या सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. यात माजी सभापती देविदास पिंगळे व त्यांचे बंधू गोकुळ पिंगळे हे सर्वसाधारण या एकाच गटातून नशीब आजमावत आहेत.

आपलं पॅनलकडून देविदास पिंगळे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, उत्तम आहेर, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, बहिरू मुळाणे रिंगणात आहेत. तर शेतकरी विकास पॅनलकडून शिवाजी चुंभळे, तानाजी करंजकर, गणेश चव्हाण, राजाराम धनवटे, नामदेव बुरंगे, प्रभाकर माळोदे, शिवाजी मेढे निवडणूक लढवत आहेत.

तसेच अपक्ष म्हणून गोकुळ पिंगळे, अनिल ढिकले, पोपट पेखळे व दिनकर साळवे हेदेखील आखाड्यात आहेत. सहकारी संस्था मतदारसंघातील इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या एका जागेसाठी आपलं पॅनलचे दिलीप थेटे व शेतकरी विकास पॅनलचे धनाजी पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे.

सहकारी संस्था मतदार संघातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी शेतकरी विकास पॅनलचे प्रल्हाद काकड व आपलं पॅनलचे विश्वास नागरे समोरासमोर आहेत.

महिलांसाठी राखीव दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये आपलं पॅनलच्या विजया कांडेकर, सविता तुंगार तर शेतकरी विकास पॅनलच्या कल्पना चुंभळे व शोभा माळवे यांच्यात लढत होणार आहे. ग्रामपंचायत संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आपलं पॅनलचे जगन्नाथ कटाळे व विनायक माळेकर, शेतकरी विकास पॅनलचे तानाजी गायकर व प्रकाश भोये, अपक्ष सोमनाथ जाधव व राजाराम धात्रक यांच्यात लढत होणार आहे.

ग्रामपंचायत संस्था मतदारसंघाच्या आर्थिक दुर्बल घटकासाठी एका जागेसाठी सरळ लढत होणार असून आपलं पॅनलच्या निर्मला कड व शेतकरी विकास पॅनलचे सदानंद नवले यांच्यात लढत होणार आहे.

ग्रामपंचायत संस्था मतदारसंघातील अनुसूचित जाती/ जमाती राखीव गटासाठी असलेल्या एका जागेसाठी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये आपलं पॅनलचे भास्कर गावित, शेतकरी विकास पॅनलच्या यमुना जाधव व अपक्ष अलका झोंबाड यांच्यात लढत होईल.

गोकुळ पिंगळेंना तलवार"

सहकारी संस्थेचा मतदारसंघाच्या एकाच म्हणजे सर्वसाधारण गटातून देविदास पिंगळे व त्यांचे लहान बंधू गोकुळ पिंगळे हे आखाड्यात आहे. गोकुळ पिंगळे यांचा अर्ज कायम राहावा यामागे खुद्द देविदास पिंगळे व त्यांच्या गटाचीच व्युव्हरचना असल्याचे बोलले जात आहे. चिन्ह वाटपात गोकुळ पिंगळे तलवार हे चिन्ह मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT