Nashik Vegetable Rate Hike esakal
नाशिक

Nashik Vegetable Rate Hike : आवक घटल्याने भाज्यांचे बाजारभाव वधारले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. मध्यंतरी वळिवाचा पाऊसही बरसल्याने वातावरणात बदल झाला आहे. परिणामी पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहेत. (Market prices of vegetables increased due to decrease in arrivals)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, अहमदाबाद (गुजरात) कडे पाठविला जातो. काही प्रमाणात स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करतात.

मात्र दर वधारले असून स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत वाढली आहे. फळभाज्यामध्ये सध्या काकडी व घेवडा, शिमला यांची सिझननुसार आवक घटली आहे. मात्र, दुधी भोपळा, कारली, दोडका, गिलके आदी फळभाज्यांची आवकही घटली आहे. (latest marathi news)

बाजार समितीत मंगळवारी (ता.२८) झालेल्या लिलावात काकडी १५ ते ३० रुपये, दुधी भोपळा ५ ते २० रुपये, गिलके २५ ते ५५ रुपये, कारले ५० ते ६० रुपये, दोडका ५५ ते ६५ रुपये, शिमला मिरची २५ ते ३५ रुपये, हिरवी मिरची ६० ते ७० रुपये, वाल ३० ते ४० रुपये, गवार ३५ ते ४५, घेवडा १०० ते १२०, वांगी १८ ते २५ रुपये असे प्रतिकिलोस दर मिळाले.

किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर ६० ते १६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. बाजार समितीत झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीर ३५ ते ७५ रुपये, चायना कोथिंबीर ४० ते ७१ रुपये, मेथी ३० ते ६९, शेपू २० ते ४५, कांदापात १० ते ५० रुपये असे जुडीला भाव मिळत आहेत. तेच किरकोळ बाजारात डबल भावाने विक्री होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT