Maternal Mortality Rate esakal
नाशिक

Nashik Maternal Mortality Rate: मातामृत्यू दर 57 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर! आदिवासी तालुक्यातील मातामृत्यू दरात घट

Nashik News : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या गाभा समितीच्या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Maternal Mortality Rate : जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमधील मातामृत्यूचा दर घटत आहे. २०२१-२२ मध्ये मातामृत्यूचा ५७ टक्के असलेला दर मार्च २०२४ मध्ये २४ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ आदिवासी तालुक्यांत तीन वर्षांत ८९ हजार ३९२ मातांची प्रसूती झाली असून, यात विविध कारणांनी ३६ मातांचा मृत्यू झाला आहे.

मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले असले, तरी ते शून्यावर आणण्याचे ध्येय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. (Nashik Maternal mortality rate from 57 percent to 24 percent in tribal talukas)

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या गाभा समितीच्या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे. साधारण आदिवासी तालुक्यांमध्ये पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा काळ पाहिल्यास महिलांची प्रसूती रुग्णालयाऐवजी घरीच दायीच्या मदतीने केली जात होती. त्यामुळे प्रसतिदरम्यान महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते.

शिवाय, गर्भवतींची नियमित तपासणी किंवा आरोग्याची निगा राखली जात नसल्याचे कारणदेखील यामागे होते. मात्र, शासनाच्या जननी सुरक्षा योजनेमुळे प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात येऊ लागल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होऊन वेळात उपचार मिळत आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभही या महिलांना मिळत आहे. परिणामी मातामृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे.

आरोग्य विभागाच्या उपाययोजना

आदिवासी तालुक्यांमधील वाढत्या मातामृत्यूचा अभ्यास केला असता यात, प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव, गरोदरपणातील उच्च रक्तदाब, रक्तक्षय (हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे) या कारणांनी मातांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी आरोग्य विभागाने मातामृत्यूच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली. यात मातांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांनी होत असल्याची कारणे शोधली. त्यातील महत्त्वाचे कारण कुपोषित माता असल्याचे दिसून आले.

अशी केली अंमलबजावणी

- अतिजोखीम मातांवर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत विशेष लक्ष केंद्रित

- मातेचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती, स्तनदा मातांना सकस आहार कसा मिळेल, याकडे लक्ष

- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महिलांना १५० दिवसांत एक हजार, दुसऱ्या टप्प्यात दोन हजार आणि प्रसूतीनंतर दोन हजार रुपये दिले जातात, या योजनेची काटेकोर अंमलबजावणी

- गर्भवतींची नोंदणी आरोग्य केंद्रात बंधनकारक करून सोनोग्राफी करण्यावर भर

- दरमहा नऊ तारखेला पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गर्भवतींचा स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी बंधनकारक

- दोन बाळांमध्ये अंतर असावे, कुटुंब नियोजन करण्यासाठी समुपदेशनावर भर

 (latest marathi news)

मातामृत्यू आकडेवारी

२०२१-२२ २०२२-२३ २०२३ ते २०२४

तालुका प्रसूती मृत्यू प्रसूती मृत्यू प्रसूती मृत्यू

बागलाण २०६५० १९५६१ २०२१३

देवळा ११५२० १०५०१ १११००

दिंडोरी ६०३४२ ५९२७२ ५८७२१

इगतपुरी ४५१५३ ४४४७१ ४४२१०

कळवण ४०४२२ ३९३१० ४१०१३

नाशिक (ग्रामीण) २३९६२ २१६११ २०५६०

पेठ २६८५२ २५८४२ २४५६०

सुरगाणा ४०३२४ ३९४९१ ३८१०१

त्र्यंबकेश्वर ३६१३३ ३५०३२ ३२८९०

"आदिवासी तालुक्यात मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काम सुरू आहे. मातामृत्यूचा हा दर शून्य करण्याचे ध्येय निश्चित केले असून, त्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत."

- डॉ. हर्शल नेहते, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार! उद्धव ठाकरेंची कोल्हापूरात घोषणा, महायुतीवर हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूतची हत्याच! सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा; म्हणाली- एम्सच्या डॉक्टरने रिपोर्ट...

IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर... लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

SCROLL FOR NEXT