नाशिक

महापौरांकडून 'बीओटी' प्रस्तावाचे जोरदार समर्थन

सकाऴ वृत्तसेवा

विरोधाला विरोध करणे ही विरोधकांची रणनीती असून, त्यातून शहर विकासाला बाधा निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिक: महापालिकेच्या बावीसपैकी अकरा मिळकतींचा बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर विकास करण्यावरून विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर टीका होत असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी अखेर मौन सोडत प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले. विरोधाला विरोध करणे ही विरोधकांची रणनीती असून, त्यातून शहर विकासाला बाधा निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पालिकेच्या मिळकतीचा बीओटीवर विकास करण्याचा प्रस्ताव जादा विषयांमध्ये मंजूर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी बीओटीच्या प्रस्तावाचे समर्थन केले. परंतु, पालिकेत बहुमत असताना जादा विषयामध्ये मंजुरी का दिली, याबाबत मात्र खुलासा करण्याचे टाळले. ते म्हणाले, अनेक वर्षांपासून मिळकती पडून आहेत. बीओटी तत्त्वावर विकास झाल्यास महापालिकेला सव्वाशे कोटीपर्यंत उत्पन्न मिळेल. पूर्व व सातपूर विभागासाठी दोन विभागीय कार्यालये बांधून मिळतील. मोठ्या रुग्णालयाची वास्तूदेखील बांधून मिळणार आहे. रविवार कांरजावरील यशवंत मंडईचे रूपांतर बहुमजली वाहनतळात होईल. पेलीकन पार्क येथे बहुमजली वाहनतळ उपलब्ध होईल. वीस ते बावीस हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल. विरोधकांकडून चुकीच्या विधानाद्वारे दिशाभूल केली जात आहे.

द्वारका येथील जागा अतिक्रमनामुळे अनेक वर्षांपासून पडून आहे. यापूर्वी या जागेवर विभागीय कार्यालयाचा ठराव पारित केला. परंतु, आतापर्यंत कार्यवाही झाली नाही. भद्रकाली स्टॅन्डच्या जागेवर शॉपिंग सेंटर बांधले जाणार आहेत. मेनरोड विभागीय कार्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची दगडी भिंत कोसळत असल्याने विकास गरजेचा आहे. बी. डी. भालेकर येथील शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. ज्या मिळकतींचा विकास केला जाणार आहे. शासकीय नियमानुसार जुन्या इमारती पुन्हा नव्याने बांधणे किंवा उभारणे सुसंगत आहे. पालिकेच्या मिळकती बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहे, हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. बीओटीच्या माध्यमातून पन्नास टक्के बांधीव क्षेत्र महापालिकेला मिळेल. आर्किटेक्ट पॅनेलवरील एजन्सीने सिटी सेंटर मॉलचे डिझाईन केले आहे. त्यामुळे ठराविक मक्तेदारालाच काम दिल्याचा गैरसमज निर्माण केला जात आहे.

विरोधासाठी काम अडविण्याची भूमिका

सवंग लोकप्रियतेसाठी राजीव गांधी भवन विकायला काढले, असा आरोप विरोधकांचा आहे. परंतु, असा विचार विरोधकांच्या मनात येऊ शकतो. अशा प्रकारचे वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांना शेाभनीय नसल्याचे महापौर कुलकर्णी यांनी टीका केली. केवळ विरोधासाठी काम अडविण्याची भूमिका विरोधकांची आहे. विरोधकांनी अंतर्मुख होऊन विकासाभिमुख विचार केला पाहिजे. परंतु, पक्षिय राजकारणामध्ये गुंतून पडल्याने चांगले व वाईट विरोधकांना समजत नाही, हे नाशिककरांचे हे दुर्दैव आहे. विरोधकांनी राज्य शासनाकडे शहराचे जटिल प्रश्न सोडविले असते तर ते अधिक चांगले झाले असते.

बीओटी तत्त्वाचा जगाने स्वीकार केल्याने ठराविक नेतेच का विरोध करीत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. महासभेने विषय दाखलमान्य करून मंजुरी दिली व प्रशासनानेदेखील मान्यता दिली. प्रकल्प अहवाल तपासून योग्य वाटल्यास निविदा काढू. प्रकल्पातून महापालिकेला बांधीव क्षेत्र उपलब्ध होईल.

- सतीश कुलकर्णी, महापौर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT