admission esakal
नाशिक

MBBS and BDS : एमबीबीएस, बीडीएसची दुसरी फेरी शुक्रवारपासून; पहिल्‍या फेरीनंतर अवघ्या काही जागा रिक्‍त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वैद्यकीय शाखेतील एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांच्‍या पहिल्‍या फेरीला राज्‍यभरात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या फेरीनंतर अवघ्या काही जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्‍यानुसार दुसऱ्या फेरीची प्रक्रिया शुक्रवार (ता. २७) पासून सुरू होत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नॅशनल इंट्रन्स कम इलिजिब्‍लीटी टेस्‍ट (नीट) परीक्षा घेण्यात आली होती. (MBBS and BDS 2nd round from Friday after 1st round only few seats vacant)

या परीक्षेच्‍या आयोजनासंदर्भात न्‍यायालयात दाखल याचिकांमुळे पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला होता. दरम्‍यान, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम एमबीबीएस आणि दंतशास्‍त्रातील पदवी अभ्यासक्रम बीडीएस यांच्‍या प्रथम वर्षास प्रवेशासाठी यापूर्वी एक प्रवेश फेरी झाली आहे. प्रवेशप्रक्रिया यंत्रणेने दिलेल्‍या माहितीनुसार या फेरीनंतर काही जागाच रिक्‍त राहिल्‍या आहेत. त्‍यानुसार शासकीय, महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी तत्त्वावरील व अल्‍पसंख्यांक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पुढील दोन फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. दरम्‍यान, कमी जागा शिल्‍लक असल्‍याने प्रवेशासाठी चुरस बघायला मिळणार आहे. (latest marathi news)

असे आहे वेळापत्रक

वैद्यकीय अभ्यासक्रमाला घेतलेला प्रवेश रद्द करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना बुधवार (ता. २५) पर्यंत मुदत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीसाठी रिक्‍त जागांचा तपशील गुरुवारी (ता. २६) प्रसिद्ध केला जाईल. इच्‍छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यासाठी २७ ते २९ सप्‍टेंबर अशी मुदत असेल. ३० सप्‍टेंबरला दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १ ते ४ ऑक्‍टोबर अशी मुदत दिली जाईल. यानंतर पुढील दहा दिवस तांत्रिक प्रक्रिया पार पडल्‍यानंतर १५ ऑक्‍टोबरपासून तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताकडे चीनला मागे टाकत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याची संधी; जाणून घ्या काय आहेत समीकरणे

Nitin Gadkari :... अन्यथा 'हे' दोन रस्ते ताब्यात घेऊ; नितीन गडकरींनी राज्य सरकारला दिला तीन महिन्यांचा वेळ

TRAI Marketing Calls : मार्केटिंग कॉल्सच्या त्रासाला म्हणा रामराम; TRAIने लागू केला एकदम भारी नियम,एकदा बघाच

Kiran Mane : तिकळी मालिका सोडून किरण मानेंची कलर्स मराठीवर एंट्री ; या मालिकेत करणार काम

Latest Maharashtra News Live Updates: डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांकडून अभिवादन

SCROLL FOR NEXT