Nashik MD Drug Case sakal
नाशिक

Nashik MD Drug Case : वडाळागावातून छोटी भाभीचा पंटर चिपड्या जेरबंद; वर्षभरानंतर कारवाई : 4 दिवसांची कोठडी

Latest Crime News : गेल्या वर्षी वडाळागावात छोटी भाभी उर्फ नसरिण शेख हिचा एमडी ड्रगजाचा अड्डा उदधवस्त केला होता.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या वर्षी वडाळागावात छोटी भाभी उर्फ नसरिण शेख हिचा एमडी ड्रगजाचा अड्डा उदधवस्त केला होता. याचप्रकरणात संबंध असल्याने शहर गुन्हेशाखेने संशयित व चिपड्या उर्फ इरफान नूर मोहम्मद शेख (३०, रा सादिकनगर, वडाळागाव) यास बुधवारी (ता. २) रात्री अटक केली आहे. संशयित चिपड्याची राजकीय नेत्यांशी जवळीक असल्यानेच त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप यापूर्वी झाले होते. मात्र या कारवाईमुळे अनेकांचा भुवया उंचावल्या असून तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. (Chhoti Bhabhi punter Chopra from Wadala Gaon jailed for 4 days )

गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी शिंदे गावात एमडी माफिया ललित पवार याचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नाशिक पोलिसांनी वडाळागावात मध्यरात्री छापा टाकून छोटी भाभी उर्फ नसरीन शेख हिला 54 ग्रॅम एमडीसह अटक केली होती. याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती इम्तियाज शेख, वसीम रफिक शेख यांच्यासह ड्रग्ज पेडलर सलमान फलके, शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजिज मेमन यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या गुन्ह्याचा तपास थंडावला होतो.

दरम्यान, आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सदरील गुन्ह्याच्या तपासाच्या सूचना दिल्या असता शहर गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने किरण सोनटक्के यास सिन्नरमधून अटक केली. त्याच्या चौकशीतून संशयित चिपड्या उर्फ इरफान शेख याचाही छोटी भाभी ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले असता, युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (ता.२) रात्री सादिकनगरमधून अटक केली. अटक केलेल्या दोघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

छोटी भाभीच्या होता संपर्कात

गुन्हे शाखेने संशयित चिपड्या याचा शोध घेत असताना त्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. तो छोटी भाभीच्या सतत संपर्कात होता. दोघांमध्ये मोठ्याप्रमाणात फोन कॉल्स असल्याचेही समोर आलेले आहे.

राजकीय वरदहस्त

गेल्या वर्षी वडाळागावातील छोट्या भाभीविरोधातील एमडीची कारवाई झाली असता, त्यावेळीही चिपड्याचे नाव चर्चेत होते. परंतु त्याचे सत्ताधारी आमदाराशी जवळीक असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. मात्र, चिपड्याच्या अटकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या असून, चौकशीत आणखी कोणाचे नावे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT