lalit patil md drug case esakal
नाशिक

Nashik MD Drug Case: नाशिक पोलीस घेणार इम्रान, गुड्डूचा ताबा! ड्रग्समाफिया ललितसह चौघे आर्थर रोड कारागृहात रवाना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिंदेगावातील एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जप्रकरणी चौकशीसाठी आणलेला ड्रग्समाफिया ललित पाटील याच्यासह चौघांना नाशिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

तर, याचप्रकरणी चौकशीतून मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इम्रान व गुड्डू या संशयितांचा सहभाग निष्पन्न झाल्याने चौकशीसाठी नाशिक पोलिसात ताबा घेणार आहेत. (Nashik MD Drug Case Nashik Police will take custody of Imran Guddu Drugsmafia Lalit along with 4 sent to Arthur Road Jail crime)

शिंदेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यावर गेल्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी छापा टाकून सुमारे कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा व साहित्य जप्त केले होता.

याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित पाटील यास त्यानंतर मुंबई पोलिसांनी बेंगलूरूतून अटक केली होती. मुंबई-पुण्यात चौकशी झाल्यानंतर त्यास नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

त्याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (ता.१८) संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता, ललितसह रोहित चौधरी, हरिष पंत व जिशान शेख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

त्यामुळे या चौघांना परत मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात पाठविण्यात येणार असल्याचे अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिलीपसिंह वसावे यांनी सांगितले.

दरम्यान, ललित पाटीलसह भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या चौकशीतून शिंदेगावातील कारखान्यातून एमडी ड्रग्जचा साठा हरिश पंत याच्यासह इम्रान मुंबईला घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. इम्रान यास मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे.

त्याचप्रमाणे, गुड्डू याचाही सहभाग निष्पन्न झालेला आहे. त्यामुळे इम्रान व गुड्डू यांचा चौकशीसाठी ताबा घेण्यासाठी नाशिक पोलीसांकडून कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांच्या चौकशीतून आणखीही खुलासे होण्याची शक्यता आहे.

फय्याजचा शोध सुरूच

सामनगाव एमडी प्रकरणात नाशिक पोलिसांनी सोलापूरातील दोघ कारखाने उदध्वस्त केले. तसेच या गुन्ह्यातील टोळी जेरबंद करीत त्यांच्यावर मोक्काही लावण्यात आलेला आहे.

परंतु सोलापूरात तयार केले जाणारे एमडी ड्रग्ज राज्यातच नव्हे तर परराज्यात विक्री करणारा फय्याज हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. तर, या टोळीचा म्होरक्या उमेश वाघ याच्या चौकशीतूनही पोलिस फय्याजचा माग काढत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT