Arrested drug peddler with MD drugs. Sandeep Mitke, Assistant Commissioner of City Crime Branch. including the Special Squad of the Crime Branch. esakal
नाशिक

Nashik MD Drugs Crime : नाशिकवरती ‘एमडी’चे ढग कायम! दीड लाखांच्या ड्रग्जसह दोघे पेडलर अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drugs Crime : शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या परिसरातून शहर गुन्हेशाखेच्या पथकाने दोघांना सुमारे दीड लाखांच्या एमडी ड्रग्जस्‌सह (मेफेड्रॉन) शिताफीने अटक केली आहे. यामुळे शहरात अजूनही एमडी ड्रग्जस्‌ची चोरीछुप्या विक्री सुरूच असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शहर पोलिसांनी गेल्या आठ-दहा महिन्यात एमडी ड्रग्जस्‌चे रॅकेट उद्‌ध्वस्त करीत परजिल्ह्यातील कारखानेही मोडीत काढले. परंतु तरीही शहरातील एमडी विक्रीवर अद्याप आळा बसू न शकल्याने पोलिसांसमोर एमडीचे रॅकेट समूळ नष्ट करण्याचे मोठे आव्हान आहे. (Nashik MD drugs cases in city over)

धीरज धनराज चांदनानी (२४, रा. श्रीरामवाडी, एमजी रोड, नाशिक), रोहीत सुनिल अहिरराव (२७, रा. सुयश अपार्टमेंट, रामकृष्णनगर, मखमलाबाद शिवार) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित एमडी ड्रग्ज पेडलरची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ६० हजारांचे ३२ ग्रॅम एमडी ड्रग्जस्‌ जप्त केली आहे. दोघांना न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (ता. २२) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेचे अंमलदार देवकिसन गायकर, सानप व बागडे यांना बुधवारी (ता. १९) रात्री एमडी ड्रग्जस्‌ पेडलर रविवार कारंजा परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर शहर गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कारंजा ते रेडक्रॉस सिग्नलपर्यंत सापळा रचला.

रात्री साडेआठच्या सुमारास दोघे संशयित बालाजी एजन्सीसमोरील ॲक्सिस बँकेजवळ आले असता, दबा धरून असलेल्या पथकाने दोघांना शिताफीने अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून १ लाख ६० हजारांचे ३२ ग्रॅम एमडी ड्रग्जस्‌ जप्त करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, भोई, रंजन बेंडाळे, किशोर रोकडे, ताजणे, गायकर, योगेश चव्हाण, जगझाप, कोल्हे, दत्ता चकोर, बाळा नांद्रे, राऊत, चंद्रकांत बागडे, विठ्ठल चव्हाण, महिला अंमलदार भड यांच्या पथकाने बजावली. (latest marathi news)

५ हजार प्रतीग्रॅमने विक्री

अटक करण्यात आलेले ड्रग्जस्‌ पेडलर हे नजिकच्या परजिल्ह्यातून एमडी ड्रग्जस्‌ खरेदी करून चोरीछुप्या रितीने नाशिकमध्ये विक्री करीत होते. ते प्रतीग्रॅम ५ हजार रुपये याप्रमाणे ठराविक ग्राहकांनाच एमडी विक्री करायचे. तर, तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतीग्रॅमने ते एमडी खरेदी करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. संशयित ड्रग्जस्‌ पेडलरच्या रॅकेटचा पोलिस कसून तपास करीत आहे.

आयुक्तांसमोर आव्हान

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पुण्यात असताना एमडी प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी नाशिकमधील शिंदेगावात एमडीचे कारखाने उघडकीस आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी शहरातील एमडी ड्रग्जस्‌ मोठे रॅकेट उदध्वस्त करीत त्यांना सोलापूरातील दोन कारखाने मोडीत काढले. परंतु त्यानंतर शहरातील एमडी ड्रग्जस्‌ विक्री थांबलेली नाही. यामुळे शहरातून एमडी समूळ नष्ट करण्यासाठी शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT