State President Jayant Patil and others while speaking at the NCP Youth Congress meeting.
State President Jayant Patil and others while speaking at the NCP Youth Congress meeting. esakal
नाशिक

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मिळालेले यश याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन जयंत पाटील यांनी कौतुक केले. (Jayant Patil)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग उपस्थित होते. या वेळी नाशिक जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुरू असलेल्या कामांचा अहवाल प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर सादर केला.

शिवाय नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात युवक काँग्रेसने कसे नियोजन करून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. तो अहवाल जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांनी सादर केला. (latest marathi news)

दोन्ही मतदारसंघांत युवक काँग्रेसने केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. तसेच शहरातील तीनही मतदारसंघाच्या कामाचा अहवाल शहराध्यक्ष बाळा निगळ यांनी सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकासाठी मतदारसंघात राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी दौरा करून लोकांची मानसिकता काय, यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, शहराध्यक्ष बाळा निगळ, प्रदेश पदाधिकारी शाहू शिंदे, किरण भुसारे, दिनेश धात्रक, किरण कातोरे, संदीप भेरे, वैभव धांडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Russia Tour: असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा, एका क्लिकवर वाचा संपूर्ण शेड्युल

Crop Insurance : पीकविम्याचे 853 कोटी मिळणार : पालकमंत्री दादा भुसे

T20 WC Prize Money Split : टीम इंडियामध्ये 125 कोटींची झाली वाटणी.... खेळाडूंपासून ते सिलेक्टरपर्यंत कोणाला मिळणार किती पैसे?

Ranbir Kapoor : आणि रणबीरने ठेवली पहिली कमाई आईच्या पायावर ; नीतू कपूर यांना झाले अश्रू अनावर

Maharashtra Live News Updates : मुसळधार पावसाचा विधीमंडळ कामाकाजाला फटका

SCROLL FOR NEXT