potholes on Nashik Mumbai highway (file photo) esakal
नाशिक

Nashik News : नाशिक- मुंबई महामार्गावरील खड्ड्यांवरून उद्या मंत्रालयात बैठक

Nashik News : नाशिक- मुंबई महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून, मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई- नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने साडेतीन तासाचे अंतर साडेसात तासांवर पोचल्याने या विरोधात जिल्ह्यातील आमदारांनी आवाज उठविल्यानंतर खड्ड्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (ता. ८) मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (meeting in ministry tomorrow over potholes on Nashik Mumbai highway)

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे बैठकीला उपस्थित राहणार आहे. नाशिक- मुंबई महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून, मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

नाशिक ते कल्याण फाटा या दरम्यान पोचण्यासाठी दोन ते सव्वादोन तास लागतात, मात्र खड्ड्यांमुळे हेच अंतर आता साडेतीन तासांवर पोचले आहे. भिवंडी नाका ते ठाणे यादरम्यान खड्ड्यांमुळे व रस्त्याच्या कामामुळे वाहतूक खोळंबा होतो. यामुळे मुंबईत पोचण्यासाठी आठ ते दहा तासांचा वेळ लागतो. छगन भुजबळ यांनी महामार्गावरील खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची मागणी यापूर्वी केली होती. त्याचबरोबर आमदार राहुल ढिकले, फरांदे व हिरे यांनीदेखील विधिमंडळात या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. नाशिक ते मुंबई महामार्गाचे तीन विभाग आहे. (latest marathi news)

भिवंडी बायपासपर्यंतचा रस्ता तीन यंत्रणेकडे विभागून आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्त्याचा काही भाग असून, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे काही भाग आहे. त्याचबरोबर काही भाग राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देखभाल व दुरुस्ती केली जाते.

त्यामुळे खड्ड्यांवरील रस्त्यांवरून एकमेकांकडे आरोप प्रत्यारोप होतात. यातून प्रश्न मात्र सुटत नाही. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT