Mhada esakal
नाशिक

Nashik News : सातबारा विभाजन चौकशी समितीच्या बैठकीत MHADA चे अधिकारी गैरहजर! पुढील बैठक 25 तारखेला

Latest Nashik News : म्हाडाची माहिती चौकशी समितीला अद्याप प्राप्त झालेली नाही. पण महापालिकेने काही प्रमाणात माहिती दिलेली आहे. त्यावर थोड्याफार प्रमाणात चर्चा झाली. आता पुढील सुनावणी पुढच्या शुक्रवारी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गृहनिर्माण प्रकल्प उभारताना आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २० टक्के जागेचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीची शुक्रवारी (ता.११) बैठक पार पडली. मात्र, ‘म्हाडा’चे प्रमुख अधिकारीच बैठकीला अनुपस्थित राहिल्याने फक्त महापालिकेने सादर केलेल्या त्रोटक माहितीवर चर्चा करून चौकशी समितीने आवरते घेतले. आता पुढील सुनावणी २५ तारखेला होणार आहे. (MHADA officials absent)

महापालिका क्षेत्रात एक एकर व त्यापेक्षा अधिक आकाराच्या क्षेत्रावर गृहनिर्माण प्रकल्प उभारल्यास त्यातील २० टक्के जागा गरिबांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. उभारलेल्या घरांमधील २० टक्के घरे ही म्हाडाकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. २०१३ पासून हा कायदा अमलात आलेला आहे.

परंतु, शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी त्यातील पळवाटा शोधून हा जागा गरिबांना वितरित केलेल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने पहिली बैठक ४ ऑक्टोबर रोजी घेतली. (latest marathi news)

त्यानंतर शुक्रवारी (ता.११) दुसरी बैठक पार पडली. बैठकीला म्हाडाचे अधिकारी अनुपस्थित होते. मंत्री महोदयांचा दौरा असल्यामुळे ते हजर राहू शकले नाही. त्यामुळे म्हाडाची माहिती चौकशी समितीला अद्याप प्राप्त झालेली नाही. पण महापालिकेने काही प्रमाणात माहिती दिलेली आहे. त्यावर थोड्याफार प्रमाणात चर्चा झाली. आता पुढील सुनावणी पुढच्या शुक्रवारी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT