MHT-CET Exam esakla
नाशिक

MHT-CET Exam : विविध सीईटी परीक्षांसाठी 12 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

MHT-CET Exam : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

MHT-CET Exam : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होत आहे. सीईटी सेलतर्फे विविध वीस सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्‍यासाठी तब्‍बल सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक सुमारे सव्वालाख विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. (nashik MHT-CET Exam Registration of 12 lakh students for various CET exams marathi news)

गेल्‍या महिन्‍यात मार्च‍यापासूनच सीईटी परीक्षा पार पडत आहेत. काही सीईटी परीक्षांच्‍या नोंदणीला तिसऱ्यांदा मुदत दिली असल्‍याने त्‍यांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा एप्रिल-मेमध्ये होणार आहे. दरम्‍यान, विविध सीईटी परीक्षांच्‍या नोंदणीला राज्‍यस्‍तरावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आणखी नोंदणी सुरू असल्‍याने नोंदणीकृत विद्यार्थी संख्येत आणखी वाढ होणार आहे.विविध शिक्षणक्रमांच्‍या एकूण वीस सीईटी परीक्षा घेतल्‍या जात असून, यापैकी दहा परीक्षा आत्तापर्यंत झाल्या ‍आहेत. तर उर्वरित दहा परीक्षा एप्रिल-मेमध्ये घेतल्‍या जाणार आहेत.

आत्तापर्यंत झालेल्‍या दहा सीईटी परीक्षांना एकूण तीन लाख ३० हजार ५७१ विद्यार्थी सामोरे गेले आहे. बहुतांश सर्वच सीईटी परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) असून, विद्यार्थी संख्येच्‍या आधारे एक किंवा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत.

बीबीए, बीसीएला प्रतिसाद

या वर्षी प्रथमच होत असलेल्‍या बीबीए/बीसीए शिक्षणक्रमांच्‍या सीईटीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे बारा हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी मुदतीत ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे. (latest marathi news)

शिक्षणक्रमनिहाय नोंदणीकृत विद्यार्थी असे-

* एमएचटी सीईटी---------------७ लाख २४ हजार ६४०

* एमबीए सीईटी-----------------१ लाख ५२ हजार ९११

* बी.एस्सी नर्सिंग सीईटी-------५३ हजार ३१६

* बीबीए/बीसीए सीईटी------------११ हजार ८९०

* एलएलबी (३ वर्षे)----------------८० हजार १२५

* एलएलबी (५ वर्षे)----------------३३ हजार ००८

बी.एड. (जनरल व स्‍पेशल)----------७९ हजार ०८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT