नाशिक : तिसऱ्या आघाडीचा मुद्दा जात व धर्माच्या पलीकडे असून, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी आघाडी आहे; परंतु तिसऱ्या आघाडीत येऊ इच्छिणाऱ्या एमआयएमची प्रखरता पचविणे आम्हाला सहज शक्य होणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीत ‘एमआयएम’ला स्थान दिले जाणार नसल्याचे प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. आमदार कडू नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (MIM has no place in third alliance explain Bacchu Kadu )
ते म्हणाले, की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या महाआघाडीची महाशक्ती आम्ही निर्माण करणार आहोत, ही महाशक्ती जनतेची राहील. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे चुलतभाऊ राजदत्त आंबेडकर त्याचप्रमाणे इतर मुस्लिम संघटनांना सोबत घेऊन वैचारिक बैठक मांडली जाणार आहे. या बैठकीमध्ये तिसऱ्या महाआघाडी संदर्भातील सर्व मुद्दे स्पष्ट होतील.
हे मुद्दे घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. एमआयएम हा पक्ष तिसऱ्या आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहे. मात्र या पक्षाची प्रखरता पचविणे आम्हाला व लोकांनाही सहज शक्य होणार नाही. आमचा मुद्दा हा धर्म व जातीच्या पलीकडे तसेच कष्टकरी शेतकरी यांचा आहे. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या कोणत्याही पक्षापासून दूर राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. (latest marathi news)
जनतेच्या प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही
कांदा उत्पादकांना स्थिर भाव देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ते म्हणाले, की कांद्याचे भाव मातीमोल झाले तेव्हा लक्षवेधी का आणली नाही, असा सवाल करत आगामी निवडणुकीत काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष याचा वचपा काढला जाईल. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर आमदार कडू यांनी टीका केली.
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल. महाविकास आघाडी एकसंध नाही हे मुख्यमंत्रिपदावरून दिसून येते. महायुतीला दिलेल्या प्रस्तावाचे अद्याप उत्तर आलेले नाही. याचा अर्थ त्यांना महायुतीत ठेवायचे नाही असा होतो. असे स्पष्टीकरण देताना कुठल्याच पक्षाचे लक्ष जनतेच्या प्रश्नाकडे नाही, असा टोला महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांना लगावला.
‘सिव्हिल सर्जन’च्या कानपटात मारू
नाशिकचे सिव्हिल सर्जन त्रासदायक आहेत. आरोग्य सहसंचालकांनी पत्र देऊनही वंदना पगार यांना प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात मुख्य सचिवांकडे बैठक लावली असून, सीएस यांनी ऐकले नाही तर कानपटात मारू, असा इशारा त्यांनी दिला. बाळू मरकडला दिव्यांग नसतानादेखील प्रमाणपत्र देण्यात आल्याने सिव्हिल सर्जनवर त्यांनी जोरदार टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.