From the left, Dr. Sudhir Sanklecha, Vijay Raut, Suresh Bhatewara, Raosaheb Kasbe, Minister Chhagan Bhujbal, Mahesh Zagde, Author Dr. Kailas commode and Mangala commode. esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : कर्तृत्वहीन लोक जातीवर मते मागतात : मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : ओबीसी समाजात आजही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण टिकावे, यासाठी माझा लढा राहिला; पण समाजाचे काम करताना फायद्यापेक्षा तोटाच अधिक झाला.

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : ओबीसी समाजात आजही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण टिकावे, यासाठी माझा लढा राहिला; पण समाजाचे काम करताना फायद्यापेक्षा तोटाच अधिक झाला. नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही जातीवर आधारित मतदान झाले आणि पराभव पत्करावा लागला. कर्तृत्व नसलेल्या व्यक्तीच जातीच्या आधारे मते मागतात, असा टोला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे नाव न घेता लगावला. (nashik Minister Chhagan Bhujbal statement Inefficient people demand votes on caste marathi news)

माळी समाज सेवा समितीतर्फे प्रकाशित व डॉ. कैलास कमोद लिखित ‘फुलला माळ्याचा मळा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (ता. १७) हा सोहळा झाला. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे, डॉ. कैलास कमोद, मंगला कमोद, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.श्री. भुजबळ म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात माळी समाजाने पुढे आले पाहिजे. इतरांनी राजकारण करायचे आणि आपण फक्त बघत रहायचे का? देशात आठ ते नऊ टक्के माळी समाज आहे. त्याप्रमाणात आयएएस, आयपीएस अधिकारी होणाऱ्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही. माळी समाजातील पोटजातीही नष्ट व्हायला हव्यात. (latest marathi news)

श्री. कसबे म्हणाले, भाजपला राज्यघटनेत बदल करायचा आहे. मात्र त्यांनी कितीही ठरविले तरी सर्वसामान्य जनता त्यांना घटना बदलू देणार नाही. त्यांच्याबरोबर सत्तेत जाणे म्हणजे विषारी सापाबरोबर जाण्यासारखे आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. लेखक डॉ. कमोद यांनी पुस्तक लेखनाचा उद्देश स्पष्ट केला. राऊत यांनीही विचार मांडले. ॲड. हिरेन कमोद यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुधीर संकलेचा यांनी सूत्रसंचालन केले.

पंतप्रधानांनी जात सोडायला सांगावे : झगडे

माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणारी जातीयता नष्ट व्हायला हवी. जाती, धर्माच्या आडून सध्या ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे. यातून गृहकलह वाढत आहे. पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सबसिडी सोडण्याचा आग्रह देशवासीयांना केला, त्याचपद्धतीने जात सोडण्याचा आग्रह त्यांनी केला पाहिजे, असे आवाहन माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी भाषणातून केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT