Nashik News : हरवलेली चिमुकली अवघ्या काही तासांमध्ये आडगाव पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेत त्यांच्या स्वाधीन केली. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या पत्नी सायकलिस्ट नलिनी कड यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या तत्परतेमुळे हे शक्य झाले. छत्रपती संभाजी रोडवरून सायकलिस्ट नलिनी कड या पहाटे सायकलिंग करत मिरची हॉटेलकडे जात असताना त्यांना दहा वर्षाची चिमुकली रस्त्याच्या बाजूने रडत असलेली दिसली. ( Missing toddler in custody of relatives within hours by police )
त्यांनी याठिकाणी थांबत चिमुकलीकडे चौकशी केली. परंतु तिला तिचे नाव पत्ता सांगता येत नसल्याने नलिनी कड यांनी पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांना फोन करून सर्व हकिगत सांगितली. श्री. कड यांनी आडगाव पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सर्व माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशाने पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, देवराम सुरंजे, पोलिस अंमलदार निखिल वाकचौरे, पोलिस अंमलदार अमोल देशमुख, दिनेश गुंबाडे व महिला पोलिस श्रीमती. वर्पे यांनी घटनास्थळी जाऊन चिमुकलीला ताब्यात घेत तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला.
मात्र तिला काहीही सांगता येत नसल्याने पोलिसांनी तिला आडगाव पोलिस ठाण्यात आणले. येथे पोलिस अंमलदार मनिषा सानप, ताई वरपे यांनी तपासाचे कौशल्य वापरून तिची चौकशी केली असता तिने आपले नाव श्रावणी दिलीप तुपे (मु. पो. जळगाव खुर्द) असे सांगितले. त्यानुसार पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ यांनी जळगाव खुर्द (ता. नांदगाव) पोलिस पाटील रवींद्र सरोदे यांच्याकडे या मुलीबाबत चौकशी करीत, तिचे काका व स्थानिक जितेंद्र सरोदे यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना संपर्क साधत त्यांना मुलीचे वर्णन व फोटो व्हॉट्सॲपद्वारे पाठवून शहानिशा केली.
त्यावरून त्यांनी त्यांची श्रावणी ही आपली भाची आहे, असेच सांगितल्याने त्यांनी मुलीची आत्या संगीता संतोष काजळकर (वृंदावन नगर, मनपा मराठी शाळेसमोर नांदूरगाव) यांचा मोबाईल दिला. पोलिसांनी श्रीमती. काजळकर यांना संपर्क करत आडगाव पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांच्याकडे सर्व चौकशी केली असता श्रावणी हि त्यांचीच भाचीच आहे हे तपासात कळाले. त्यानंतर तिला आत्या संगीता संतोष काजळकर व चुलते वसंत रामराव तुपे (रा. गीत गुंजन हाऊसिंग सोसायटी झंकार हॉटेल समोर गंजमाळ, भद्रकाली) यांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण दाइंगडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. गायकवाड, पोलिस हवालदार देवराम सुरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, शिवाजी आव्हाड, पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, मनिषा सानप, ताई वरपे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.