Nashik News : केवळ आश्वासन देऊन थांबत नाही, तर आश्वासन दिलेले कामदेखील पूर्ण करतो, असे प्रतिपादन आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी केले. आमदार निधीतून सार्वजनिक वाचनालय येथे सामाजिक सभागृह (डोम) बांधणे कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. (Nashik MLA Adv Rahul dhikle statement marathi news)
या वेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, माजी नगरसेवक दामोधर मानकर, पुंडलिकराव खोडे, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, भाजप शहर सरचिटणीस सुनील केदार, ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ काकड, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णू काकड, देवराम पवार, सुभाष तिडके, सोसायटीचे सभापती शंकरराव पिंगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार ढिकले म्हणाले, की आमचे वडील स्व. उत्तमराव ढिकले यांच्याअगदी जवळचे स्व. रामचंद्र काकडसर होते. वडिलांना सांस्कृतिक क्षेत्राची, वाचनाची आवड होती. आजही मीसुद्धा नियमितपणे वाचन करतो. त्यामुळे वाचनालयाच्या कुठल्याही कामात नेहमी पुढाकार घेतो. या सभागृहासाठी एक कोटी रुपये तरतूद धरली आहे. (latest marathi news)
येथील सभागृहाचे काम चांगले व्हावे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक निवृत्ती महाले, गोकुळ काकड, संजय फडोळ, सीताराम पिंगळे, सुभाष काकड, पंढरीनाथ काकड, मविप्र संस्थेचे संचालक रमेश पिंगळे, सोसायटीचे माजी सभापती मदनशेठ पिंगळे, पहिलवान वाळू काकड,
संजय फडोळ, कैलास दराडे, बापू पिंगळे, रामदास काकड, संजय गामणे, संजय पिंगळे, वास्तुविशारद पंडित काकड, उत्तम काकड, विक्रम कडाळे, बाळासाहेब काकड, भाजप पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, तुषार काकड, नारायणराव काकड, शांताराम पिंगळे, साहेबराव काकड, आबासाहेब बर्डे आदींसह वाचनालयाचे सर्व संचालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप धात्रक यांनी प्रास्ताविक केले. राजेश शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष तिडके यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.