Teacher MLA Kishore Darade and other MLAs cheering with teachers at Azad Maidan on Thursday due to the decision to increase the stage. esakal
नाशिक

Nashik News : विभागातील 7 हजारांवर शिक्षकांना टप्पावाढीचा लाभ : आमदार दराडे

Latest Nashik News : यात नाशिक विभागातील सुमारे सात हजारांवर शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली. हा निर्णय घोषित होताच दराडेंसह शिक्षक आमदारांनी आझाद मैदानात शिक्षकांबरोबर जल्लोष केला.

सकाळ वृत्तसेवा

येवला : राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवार (ता. १०)च्या बैठकीत शिक्षकांच्या अनुदानात टप्पावाढीचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील ६५ हजारांवर शिक्षकांच्या पगारात २० टक्के वाढ होणार आहे. यात नाशिक विभागातील सुमारे सात हजारांवर शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली. हा निर्णय घोषित होताच दराडेंसह शिक्षक आमदारांनी आझाद मैदानात शिक्षकांबरोबर जल्लोष केला. (7 thousand teachers in department benefit from stepwise increase)

शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी २०१६ मध्ये २० टक्के अनुदान दिले. पुढे २०२० मध्ये ४० टक्के, तर २०२२ मध्ये ६० टक्के झाले आहे. काही शाळा आजही २० टक्क्यांवर आहेत. तसेच, उच्च माध्यमिक शाळांना २०२० मध्ये २० टक्के अनुदान व २०२२ मध्ये ४० टक्के अनुदान दिले.

मात्र, त्यानंतर आश्वासन देऊनही टप्पावाढ केली जात नसल्याने अर्धवेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची हेळसांड सुरू आहे. शासन दिरंगाई करीत असल्याने राज्यभरातील हजारो शिक्षक गेल्या ५७ दिवसांपासून वाढीव टप्पा अनुदान मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेटमध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात यावा, तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान देऊन शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावे, या मागणीसाठी दोन दिवसांपासून मंत्रालय परिसरात शिक्षक आमदार दराडे, श्रीकांत देशपांडे, ज्ञानेश्वर म्हात्रे हे इतर आमदारांबरोबर उपोषणाला बसले होते.

तसेच, आमदार दराडे यांनी यापूर्वी अनेकदा सभागृहात प्रश्न उपस्थित करून वाढीव टप्पा अनुदान देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडेही पत्र देऊन शिक्षक बांधवांना न्याय देण्याची मागणी केली होती. (latest marathi news)

आता २० टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना ४० टक्के, तर ४० टक्के वेतन घेणाऱ्यांना ६० टक्के आणि ६० टक्के वेतन घेणाऱ्यांना ८० टक्के वेतन मिळणार आहे. सर्व शिक्षकांना १०० टक्के वेतन मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे दराडे यांनी जल्लोषप्रसंगी सांगितले. येत्या दोन दिवसांतच या घोषणेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित होऊन पुढील टप्पावाढ शिक्षकांना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

● यांना मिळेल अनुदानाचा लाभ

- प्राथमिक शाळा- ८२०

- वर्ग / तुकड्या- ३,५१३

- शिक्षक व इतर- ८,६०२

- माध्यमिक शाळा- १,९८४

- वर्ग / तुकड्या- २,३८०

- शिक्षक व इतर- २४,०२८

- उच्च माध्यमिक- ३,०४०

- वर्ग / तुकड्या- ३,०४३

- शिक्षक व इतर- १६,९३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT